महिलेस खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:38+5:302021-02-10T04:31:38+5:30
फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, यमुना खराबे यांचा पती अपघातात मरण पावलेला आहे. त्या एकट्याच संग्रामनगर येथील एका पत्राच्या शेडमध्ये ...

महिलेस खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा
फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, यमुना खराबे यांचा पती अपघातात मरण पावलेला आहे. त्या एकट्याच संग्रामनगर येथील एका पत्राच्या शेडमध्ये राहतात. मागील दोन वर्षांपासून इम्रान खान बशीर खान, बशीर खान फतरू खान व शेख मुस्ताक शेख शफिक हे तिघे जागा हडपण्यासाठी नेहमी त्यांना पैसे मागून धमक्या देतात. पैसे दिले नाही, तर तुझे जगणे अवघड करू, अशा धमक्या देतात. २ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये चहा पीत असताना बशीर खान फतरू खान याने अडवून पैशांची मागणी केली. त्यानंतर फिर्यादीने त्याला एक हजार रुपये दिले. मागील काही दिवसांपासून त्यांचा त्रास वाढला होता. या त्रासाला कंटाळून फिर्यादी महिलेने संशयित आरोपी इम्रान खान बशीर खान, बशीर खान फतरू खान, शेख मुस्ताक शेख शफिक यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोउपनि एस.ए. सय्यद हे करीत आहेत.