दारूची विक्री करणाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:59+5:302021-02-05T07:59:59+5:30
रस्त्यावर खड्डे जालना : जालना ते मंठा या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणेही अवघड ...

दारूची विक्री करणाऱ्यांवर गुन्हा
रस्त्यावर खड्डे
जालना : जालना ते मंठा या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली, परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बेघर निवारा केंद्रात फळवाटप
जालना : अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगनाथ शिंदे यांच्या वतीने आपुलकी शहर बेघर निवारा केंद्र जालना येथे आ.कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत अन्नदान व फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, राम सावंत, अक्षय गोरंट्याल, प्रमेंद्र अग्रवाल, सुधीर मंत्री, जिल्हाध्यक्ष साईनाथ पवार, सचिव जितेंद्र लखोटीया, सहसचिव दिलीप जायभाये, आनंद वरीयाणी, दिलीप दाणी, राम चव्हाण, अनिल अदनिया, धनंजय वझरकर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल
भोकरदन : भोकरदन बस स्थानकात मोबाइल चोरणाऱ्या एकास रंगेहाथ पकडले. एक जण मोटारसायकलवर बसून फरार झाला आहे. शनिवारी सकाळी बस स्थानकावर गर्दी असताना दुपारी १ वाजेदरम्यान बरंजळा साबळे येथील युसूफ शहा दुपारी कामासाठी मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात दोघांनी त्यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला.
दुचाकी चोरटा अटकेत, मद्देमाल जप्त
जालना : घरफोड्या करण्यासह दुचाकी चोरणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. राहुल राधेशाम वाघमारे (पारधी गल्ली, काद्राबाद, जालना) असे आरोपीचे नाव आहे. या आरोपीने विधीसंघर्ष साथीदाराच्या मदतीने एका वृद्धाचे घर फोडले होते. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधी यांना अभिवादन
जालना : महात्मा गांधी यांना चंदनझिरा येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी चंदनझिरा प्रभागाचे नगरसेवक गणेश राऊत, माजी विरोधी पक्षनेते जगननाथ चव्हाण, नगरसेवक राधाकिशन दाभाडे, माळी महासंघ जिल्हा अध्यक्ष संतोष रासवे, नानासाहेब पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास जावळे, शिवप्रकाश चित्तळकर, गणपत धोत्रे, शांतीलाल राऊत, रियाज पठाण आदी उपस्थित होते.
महात्मा गांधी यांना अभिवादन
कुंभार पिंपळगाव : देवी रेणुका माध्यमिक विद्यालय देवी दहेगाव येथे शनिवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. यावेळी हुतात्मा दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी शिक्षक, शिक्षेकत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
राजेगाव उपकेंद्र येथे बैठकीचे आयोजन
घनसावंगी : राष्ट्रीय किशोरी स्वास्थ कार्यक्रम हा घनसावंगी तालुक्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत मैत्री क्लिनिकच्या माध्यमातून किशोरी आरोग्य दिवस आणि किशोरी आरोग्य संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्यसेवा व किशोरीवयीनामधील विविध समस्या, समज- गैरसमज, शंकाकुशंका यांचे समाधान करण्यात आले. यावेळी लहू मिसाळ, डाॅ.सचिन घुगे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.
घनसावंगी येथे माझी वसुंधरा अभियान
घनसावंगी : येथील नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी मांडुरके, कारभारी सपाटे, देविदास घांडगे, योगेश्वर सपाटे, नगर पंचायत नोडल अधिकारी राजू भास्कर, नीलेश कवडी, मुकादम चव्हाण, राजू वजीर, विष्णू कदम, भागवत घाईत यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.