जुनी एमआयडीसी परिसरातून गाय चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:18+5:302021-04-02T04:31:18+5:30
एकास किरकोळ कारणावरून मारहाण जालना : किरकोळ कारणावरून एकास पाच जणांनी मारहाण केल्याची घटना सुभानपूर येथे बुधवारी घडली. या ...

जुनी एमआयडीसी परिसरातून गाय चोरी
एकास किरकोळ कारणावरून मारहाण
जालना : किरकोळ कारणावरून एकास पाच जणांनी मारहाण केल्याची घटना सुभानपूर येथे बुधवारी घडली. या प्रकरणी प्रभाकर कृष्णा गाढे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी साहेबराव तान्हाजी गाढे, समाधान साहेबराव गाढे, दशरथ काशीनाथ गाढे, काशीनाथ तान्हाजी गाढे, राजू दामोधर ढकले (सर्व रा. सुभानपूर ता. भोकरदन) यांच्याविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि. नागरगोजे हे करीत आहेत.
तू येथे का थांबला म्हणून एकास मारहाण
जालना : तू येथे का थांबला असे म्हणून एकास तिघांनी मारहाण केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगाव येथे घडली. याप्रकरणी संभाजी साहेबराव जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नितीन रामचंद्र वराडे, शैलश रामचंद्र वराडे, प्रदीप एकनाथ वराडे (सर्व रा. वडीरामसगाव, ता. घनसावंगी) यांच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.