कोविडचा वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या यादीत समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST2020-12-22T04:29:13+5:302020-12-22T04:29:13+5:30
जालना : वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीअंतर्गत गंभीर आजाराच्या यादीत कोविडचा समावेश करावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या ...

कोविडचा वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या यादीत समावेश
जालना : वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीअंतर्गत गंभीर आजाराच्या यादीत कोविडचा समावेश करावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन शासनाने कोविडचा वैद्यकीय प्रतिपूर्ती समावेश केला आहे.
शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र काकडे यांनी सांगितले. कोविड आजाराचा समावेश वैद्यकीय प्रतिपूर्तीत करण्याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना निवेदन दिले होते. शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी कोरोना महामारीच्या निर्मूलनासाठी विविध पातळीवर काम करत आहेत. त्यातून अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. शासकीय कर्तव्य पार पडताना रोगाची लागण झाल्यास आजाराचा वैद्यकीय प्रतिपूर्तीमध्ये समावेश नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत होते. ही बाब संघटनेने निदर्शनास आणून दिलेली आहे. यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देवीदास बस्वदे, सरचिटणीस कल्याण लवांडे, डॉ. रवींद्र काकडे, रवींद्र सोनवणे, संजीवनी वाघमारे, नईम म.बशीर, विजय खरात, सुनील भालतिलक, संतोष बोर्डे, प्रदीप घाटेशाही, सचिन सुरडकर, संदीप गवई, सीमा काकडे, डॉ. रेखा कलवले, सारीका जमधाडे, वर्षा चाटुफळे, रत्नमाला लहाने, कल्पना खंडागळे, सुनिता चव्हाण, संध्या कानडे, पराग डिक्कर, योगेश कुहिरे आदींनी परीश्रम घेतले.