मृताच्या वारसांना वेतनासह ओव्हरटाईम नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST2021-01-13T05:18:59+5:302021-01-13T05:18:59+5:30
याबाबत अॅड. डी. पी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफराबाद आगारात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री झालेल्या बस अपघातात वाहक ...

मृताच्या वारसांना वेतनासह ओव्हरटाईम नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश
याबाबत अॅड. डी. पी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफराबाद आगारात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री झालेल्या बस अपघातात वाहक प्रभू बळवंत काळे यांचा मृत्यू झाला होता. प्रल्हाद बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मृताची पत्नी सुरेखा प्रभू काळे व इतर वारसांनी राज्य परिवहन महामंडळाविरुद्ध जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर व अॅड. डी. पी. पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एफ. एम. ख्वाजा यांनी मृतांच्या वारसांना ओव्हरटाईम सरासरीने दरमहा तीन हजार रुपये ग्राह्य धरून मूळ वेतन २४ हजार ५७५ मध्ये सामील करून मासिक २७ हजार ५७५ रुपयांप्रमाणे एकूण ४२ लाख ६४ हजार १५७ रुपये आणि नऊ टक्के व्याजासह मंजूर केली. ओव्हरटाईम वेतनामुळे अर्जदारांना व्याजासह जवळपास पाच लाख रुपयांचा अधिक लाभ मिळाल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले.