कापूस खरेदी सात दिवस राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST2021-01-13T05:19:05+5:302021-01-13T05:19:05+5:30

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीने सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू केली होती. ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करून येथे ...

Cotton purchases will remain closed for seven days | कापूस खरेदी सात दिवस राहणार बंद

कापूस खरेदी सात दिवस राहणार बंद

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीने सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू केली होती. ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करून येथे कापूस खरेदी सुरू आहे. यात आतापर्यंत १ लाख २० हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे. तथापि, महाराष्ट्र जिनिंग कॉटन असोसिएशनने ११ व १२ जानेवारी या कालावधीत खरेदी बंद राहणार असल्याचे भारतीय कापूस निगम लिमिटेडला कळविले होते. १३ व १४ जानेवारीदरम्यान मकर संक्रांतीचा सण, १५ जानेवारीला ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदान व १६ व १७ जानेवारीला नियमित सुटी असल्याने या कालावधीत कापूस खरेदीस स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १८ जानेवारीपासून कापूस खरेदी नियमितपणे सुरू राहणार असल्याचे होंडे यांनी सांगितले. दरम्यान, खरेदी केंद्र व उपकेंद्रावर यापूर्वी दिलेल्या कापसाचे ऑनलाईन पेमेंट देण्यासाठी कर्मचारी हजर राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वरील कालावधीत कापूस विक्रीसाठी आणू नये व आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन सभापती सतीश होंडे, उपसभापती संदीप नरोडे व बाजार समिती सचिव पी .एस. सोळुंके व संचालक मंडळाने केले आहे.

Web Title: Cotton purchases will remain closed for seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.