शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
2
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
3
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
4
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
5
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
6
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
7
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
8
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
9
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
10
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
11
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
12
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
13
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
14
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
16
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
17
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
18
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
19
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
20
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस

CoronaVirus News: प्रशासन, उद्योजकांनी राखली ऑक्सिजनची पातळी; ऑक्सिजनच्या जालना पॅटर्नचा उदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 09:02 IST

ल्पावधीत उभारले भलेमोठे साठवणूक प्लांट

जालना : ‘साहेब कसेही करा; पण ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरचा बेड उपलब्ध करून द्या. नाहीतर माझे आई-वडील, भाऊ-बहीण जगूच शकत नाहीत. ते अत्यवस्थ आहेत साहेब’, अशी आर्त हाक गेल्या दोन महिन्यांत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसेच उच्चपदस्त अधिकारी आणि फॅमिली डॉक्टरांना राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत ऐकण्यास मिळाली. परंतु, जालना याला अपवाद होते. कारण, प्रशासन आणि उद्योजकांच्या प्रयत्नांमुळे ऑक्सिजनअभावी एवढे हाल कोणत्याच रुग्णाचे झाले नाहीत, हे वास्तव आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. रुग्णसंख्या खाली येण्याचे नाव घेत नव्हती. अनेकांची ऑक्सिजनची पातळी ही ९० पेक्षा खाली येत होती. तातडीने कुठले ना कुठले रुग्णालय गाठून ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरचा बेड मिळविण्यासाठी रुग्णांची जी ओढाताण झाली, ती केवळ ज्यांच्या घरी या कोरोनाने शिरकाव करून कर्ता पुरुषच कवेत घेतला होता, त्यांना ती प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे सर्वत्र धावाधाव आणि शहरातील बहुतांश रस्त्यांवरून रुग्णवाहिकांचे सायरन असे चित्र दिवसरात्र दिसत होते. परंतु, अशाही स्थितीत जालन्यात ऑक्सिजनअभावी कुठल्याच रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही बाब सकारात्मकच म्हणावी लागेल.दुसरी लाट ही अत्यंत गंभीर असणार, याचा सुगावा आधीच तज्ज्ञांनी दिला होता. त्यामुळे त्यांचा सल्ला गंभीरतेने घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर लक्ष ठेवत असताना स्वत:च्या जिल्ह्याकडे अधिकचे लक्ष दिले. गेल्या जुलै महिन्यात कोविड हॉस्पिटलमध्ये ६० लाख रुपये खर्च करून लिक्विड ऑक्सिजन साठवणुकीचा प्लांट  उभारला. यासाठी महिको कंपनीने सीएसआरमधून हा निधी दिला. तसेच स्टील असोसिएशन, रोटरी, लायन्स क्लब आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांनी या संकटाच्या काळात हात सैल सोडून मिळेल ती मदत केल्यानेच जालन्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवली नाही. कोविड हॉस्पिटलसोबतच जिल्हा रुग्णालयातही दुसरा ऑक्सिजन साठवणुकीचा प्लांट उभारला. ऐनवेळेवर येथील पोलाद स्टीलने १८ दिवसांत ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारून दररोज २५० सिलिंडर रुग्णांना मोफत दिले. तसेच आता ओमसाईराम, एसआरजे स्टील, कालिका स्टील यांनीही अल्पावधीत    ऑक्सिजन प्लांट उभारले आहेत. त्यातील ६० टक्के सिलिंडर हे गरज पडल्यास कोरोना रुग्णांसाठी देण्याच्या अटीवरच हे प्लांट सुरू केल्याचे सांगण्यात आले.तब्बल सहाशे बेडजालना कोविड हॉस्पिटल तसेच जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागात मिळून शासकीय पातळीवर ऑक्सिजनचा पुरवठा करणारे जवळपास ६०० पेक्षा अधिक बेड उपलब्ध होते. आज जवळपास ७५ टक्के ऑक्सिजनचे बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ६० हजार २६२ जणांंना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ५८ हजार रुग्ण बरे झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजन