coronavirus : जालन्यात रुग्णसंख्या दीडशे पार; आणखी २५ बाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 08:56 IST2020-06-02T08:56:24+5:302020-06-02T08:56:57+5:30
जालना जिल्ह्यातील कोरोना संख्या 153, आज तब्बल 25 रुग्ण वाढले

coronavirus : जालन्यात रुग्णसंख्या दीडशे पार; आणखी २५ बाधितांची वाढ
जालना: शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी 128 असलेली रुग्ण संख्या मंगळवारी सकाळी 153 वर पोहचल्याने तीव्र चिंता निर्माण झाली आहे.
सोमवारी रात्री उशिरा अहवाल प्राप्त झाले आहेत. यात जालना 8, सामानगाव 3,बेथल1, पांगरा1, पिंपळगाव 1,बदनापूर 2, जाफराबाद1 तर परतूर तालुक्यातील मापेगाव 8 अशी रुग्ण संख्या आहे. एकूणच एका दिवसात 25 रुग्ण वाढल्याने कोरोनाचा उद्रेक वाढला आहे.