CoronaVirus : संचारबंदीतही दारू विक्री; भोकरदन पोलिसांची अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 06:59 PM2020-03-31T18:59:44+5:302020-03-31T19:05:26+5:30

सोमवारी रात्री झाली कारवाई

CoronaVirus: Bhokardan police take action against illegal alcohol retailers | CoronaVirus : संचारबंदीतही दारू विक्री; भोकरदन पोलिसांची अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

CoronaVirus : संचारबंदीतही दारू विक्री; भोकरदन पोलिसांची अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांचे तीन ठिकाणी छापे ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त 

भोकरदन : शहरात अवैध दारूविक्री करणा-या तीन ठिकाणी धाडी टाकून भोकरदन पोलिसांनी ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली. 

शहरातील विविध भागांमध्ये छुप्या मार्गाने अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांना मिळाली. या माहितीवरून सदर तीन ठिकांणी धाडी टाकल्या.  जालना रोडवर सुरू असलेल्या दोन ठिकाणी धाडी टाकून ५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. शिवाजी बर्डे, कैलास फुके (रा. जोमाळा) यांच्यासह माल पुरविणारा सतीश ढवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. भायडी शिवारात धाड टाकून एका पत्र्याच्या शेडमधून ४२ हजार रूपयांच्या देशी दारूच्या ७६८ बॉटल जप्त करण्यात आल्या. आरोपी नितीन एकनाथ दसपुते याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनखाली उपविभागीय पोलीस अधिकारी  सुनिल जायभाये, पोलीस नाईक  रामेश्वर सिनकर, पोलीस कर्मचारी जगदीश बावणे, गणेश पायघन, सागर देवकर, निलेश फुसे, एकनाथ वाघ, चालक लक्ष्मण वाघ यांनी केली.

Web Title: CoronaVirus: Bhokardan police take action against illegal alcohol retailers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.