coronavirus : जालन्यात ३३ जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 09:40 IST2020-07-04T09:40:35+5:302020-07-04T09:40:54+5:30
शुक्रवारी १५० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

coronavirus : जालन्यात ३३ जण कोरोनाबाधित
जालना : जिल्ह्यातील तब्बल ३३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे शनिवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार समोर आले आहे.
रूग्णालय प्रशासनाकडून शुक्रवारी १५० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शनिवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार ३३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील संभाजीनगर एक, पोलास गल्ली एक, अग्रसेन नगर एक, बरवार गल्ली एक, कांचन पूल कॉलेज रोड एक, भगवान गल्ली दोन, नाथबाबा गल्ली दोन, आरपीरोड जालना दोन, मोदीखाना एक, सुभेदारनगर एक या १३ जणांसह इतर रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात आजवर एकूण ६८५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ३७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.