एका शिक्षकाला कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:18+5:302021-02-05T08:04:18+5:30
वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव शिवारातील नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर तहसीलदार ...

एका शिक्षकाला कोरोनाची बाधा
वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव शिवारातील नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्या पथकाने गुरुवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. हे ट्रॅक्टर हवालदार आर. व्ही. केंद्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी तलाठी संजय कुलकर्णी, तलाठी सचिन बागुल, सुनील ठाकरे, अनिल बर्डे आदींची उपस्थिती होती.
तिसऱ्या दिवशी ६२ हजार विद्यार्थी दाखल
जालना : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. शाळा सुरू झालेल्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी जिल्ह्यातील १६३३ शाळांमध्ये तब्बल ६२ हजार ४८७ विद्यार्थी शाळेत हजर झाले होते. विद्यार्थ्यांची हजेरी वाढावी, यासाठी शिक्षकांकडून प्रयत्न केले जात आहेत. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून ज्ञानदान केले जात आहे.
निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याची मागणी
जालना : समाजातील आदर्श पिढी निर्माण करणारा महत्त्वाचा घटक म्हणून शिक्षकांकडे पाहिले जाते. आजघडीला शिक्षकांचे सेवानिवृत्ती वय हे ५८ वर्षे आहे. परंतु, राज्य सरकारने शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक करावे, अशी मागणी जनता दरबार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर राजेश म्हस्के, सतीश म्हस्के, उषा दायमा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.