कोरोनाने ७६ महिलांचे कुंकू पुसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:28+5:302021-09-07T04:36:28+5:30

गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून कधी लॉकडाऊन तर कधी संचारबंदी करावी लागली. ...

Corona wiped the kumkum of 76 women | कोरोनाने ७६ महिलांचे कुंकू पुसले

कोरोनाने ७६ महिलांचे कुंकू पुसले

गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून कधी लॉकडाऊन तर कधी संचारबंदी करावी लागली. एकीकडे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले होते तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. यात कोणी भाऊ तर कोणी आई-वडील तर कोणी आपला पती गमावला आहे. ज्या महिला कोरोनामुळे विधवा झाल्या त्यांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश राज्य शासनाने महिला व बालकल्याण विभागाला दिले आहेत. त्यानुसार अंबड तालुक्यात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात अंबड तालुक्यात जवळपास ७६ विधवा महिला आढळून आल्या. शासनाने नुकताच एक शासन निर्णय जारी करून विधवा महिलांसाठी ‘मिशन वात्सल्य’ उपक्रमांतर्गत विविध विभागांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या २५ शासकीय योजनांचा लाभ देण्याची योजना आखली आहे. या योजनेची तालुकास्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर समिती गठित करण्यात आली आहे.

मिशन वात्सल्य उपक्रमा अंतर्गत तालुकास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करून विविध महिलांचा शोध घेण्यात आला. पंचायत समितींतर्गत बालविकास योजना प्रकल्प १ व २ अंतर्गत गावपातळीवर अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ७६ विधवा महिला आढळल्या आहेत.

भारती गेजगे, तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंबड.

Web Title: Corona wiped the kumkum of 76 women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.