जिल्ह्यात ३२ जणांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST2021-06-10T04:21:02+5:302021-06-10T04:21:02+5:30
जिल्ह्यात ५८१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात सध्या ५८१ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर संस्थात्मक अलगीकरण व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील ...

जिल्ह्यात ३२ जणांना कोरोनाची बाधा
जिल्ह्यात ५८१ सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात सध्या ५८१ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर संस्थात्मक अलगीकरण व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६० हजार ६७५ वर गेली असून, त्यातील १०४४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५९ हजार ५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
५७ जण संस्थात्मक अलगीकरण कक्षात
जिल्ह्यातील विविध ठिकाणी ५७ जणांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यात राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक १३, शासकीय मुलींचे वसतिगृह अंबड २०, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- ४, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी - १४, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह भोकरदन येथे चारजणांना ठेवण्यात आले आहे.