जिल्ह्यातील १११ जणांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST2021-02-25T04:38:22+5:302021-02-25T04:38:22+5:30
जालना : जिल्ह्यातील तब्बल १११ जणांचा कोरोना अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये जालना शहरातील ५९ जणांचा समावेश आहे. ...

जिल्ह्यातील १११ जणांना कोरोनाची बाधा
जालना : जिल्ह्यातील तब्बल १११ जणांचा कोरोना अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये जालना शहरातील ५९ जणांचा समावेश आहे. रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या ६६ जणांनाही बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात गत तीन-चार दिवसांपासून शंभरावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. बाधितांमध्ये जालना शहरातील ५९ जणांचा समावेश आहे.
तालुक्यातील निम पोखरी -१, पोखरी सिंदखेड -१, सावरगांव -१, शिरसवाडी -१, हातखेडा -१, दुधना काळेगाव -१, कडवंची -२, पीर कल्याण -१, बेथल येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंठा शहर -१, शिरपूर -१, पाटोदा -१, परतूर शहर -८, वाटूर फाटा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. घनसावंगी तालुक्यातील गाढे सावरगांव -१, अंबड शहर -८, चिंचाळा -१, श्रीपाद धामणगांव -१, चिंचखेड -१, बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी -१, पठारे देऊळगांव -१, जाफराबाद तालुक्यातील कोल्हापूर -१, घाणखेडा -१, रुपखेडा येथील एकाला बाधा झाली आहे. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा -१, जयदेवाडी -४, बुलडाणा -४, परभणी जिल्ह्यातील चार बाधितही आढळून आले आहेत, तर अँटिजेन तपासणीद्वारे १६ असे एकूण १११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजवर ३८४ जणांचा मृत्यू
आजवर जिल्ह्यात २० हजार ७२९ कोरोना संशयित आढळून आले आहेत, तर कोरोना बाधितांची संख्या १४ हजार ८९३ वर गेली असून, त्यातील ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर १३ हजार ८१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता नागरिकांनी सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
२७८ अहवालांची प्रतीक्षा
कोविड रुग्णालयाकडून दैनंदिन कोरोना संशियतांची तपासणी केली जात आहे. गत दोन दिवसांत तपासणी केलेल्यांपैकी २७८ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. तसेच बुधवारीही काही संशियतांची तपासणी करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.