गोंदी परिसरात वाढतोय कोरोना संसर्गाचा आलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST2021-05-17T04:28:40+5:302021-05-17T04:28:40+5:30
गोंदी : अंबड तालुक्यातील गोंदी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या २४ गावांमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात ...

गोंदी परिसरात वाढतोय कोरोना संसर्गाचा आलेख
गोंदी : अंबड तालुक्यातील गोंदी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या २४ गावांमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ३२० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.
गोंदी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २४ गावे येतात. मागील काही दिवसांपासून या गावांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले असले, तरी परिसरातील नागरिक नियमांचे पालन करीत नाहीत. किराणा सामान खरेदीसाठी आलेले लोक विनामास्क फिरत आहेत. गावात एकाच ठिकाणी गर्दी होत आहे. दुसरीकडे दुकानदार अर्धे शटर उघडून नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे मागील १५ दिवसांत गोंदी परिसरातील २४ गावांमध्ये रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
तब्बल ३२० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यात २१ जण गोंदी येथील आहेत.
२९७९ जणांना
मिळाली लस
n कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने लसीकरणाचा वेग वाढविला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.
n गोंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २,९७९ जणांचे लसीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.