जिल्ह्यात कोरोना वाढला; सॅनिटायझर वापर मात्र घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST2021-03-16T04:31:10+5:302021-03-16T04:31:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोनाच्या काळात मास्कचा वापर आणि सॅनिटायझरच्या वापराकडे नागरिकांनी पहिल्या लाटेत गंभीरतेने घेतले होते. ...

Corona grew in the district; Sanitizer use, however, declined! | जिल्ह्यात कोरोना वाढला; सॅनिटायझर वापर मात्र घटला!

जिल्ह्यात कोरोना वाढला; सॅनिटायझर वापर मात्र घटला!

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : कोरोनाच्या काळात मास्कचा वापर आणि सॅनिटायझरच्या वापराकडे नागरिकांनी पहिल्या लाटेत गंभीरतेने घेतले होते. परंतु, आता कोरोनाची जिल्ह्यात दुसरी लाट तेवढीच तीव्र आहे असे असले तरी मास्कचा वापर कायम असून, सॅनिटायझर मात्र महाग झाल्याने ते वापराकडे नागरिकांचा कल कमी झाला आहे.

सॅनिटायझर हे निर्जंतुकीकरण म्हणून त्याचा वैद्यकीयदृष्टया मोठा वापर केला जातो. त्यात काहीअंश हा अल्कोहोलचा असल्याने त्यापासून विषाणूचा हल्ला रोखण्याची काहीअंशी क्षमता असते. कुठल्याही वस्तूंना अथवा गाडी चालविल्यानंतर आपण हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते. दरम्यानच्या काळात कोरोनाची संख्या घटल्याने याकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती.

असे असतांनाच आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे महाग असले तरी काहीजण सॅनिटायझर घेत आहेत. पंरतु, बहुतांशजण साबण वापरण्याकडे अधिकचे लक्ष देत आहेत.

४० टक्के विक्री घटली

सॅनिटायझरचा वापर मध्यंतरी घटला होता, त्यामुळे जिल्ह्यातील विविध मेडिकल दुकानांमधून त्याची मागणी कमी झाल्याने याची विक्री जवळपास ४० टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले.

सॅनिटायझरचा वापर हा केवळ उच्च आणि मध्यमवर्गामध्येच मोठ्या प्रमाणावर आणि नियमितपणे केला जातो. हे सॅनिटायझर शासनाने मोफत वाटल्यास ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते.

सर्वसामान्यांपासून सॅनिटायझर दूर असले तरी विविध व्यापारी संस्था, बँका, आणि शासकीय कार्यालयांमध्ये मात्र सॅनिटायझर आवश्यक ठेवले जात आहे. त्याचा वापरही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

शाळा, महाविद्यालये सध्या बंद असले तरी काही मोजक्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी शासनस्तरावरून विशेष प्रयत्न म्हणून सॅनिटायझेशनला महत्त्व दिले जात आहे.

गेल्या वर्षभरापासून सॅनिटायझर हा विषय सर्वसामान्यांना कळला हाेता. डॉक्टरांनी त्याचे महत्त्वही पटवून दिले होते. कोरोना काळात याचा मोठा वापर झाला होता. परंतु, ते सहज उपलब्ध होत नसल्याने आता त्याची मागणी कमी झाली आहे.

- साईनाथ पवार,

पदाधिकारी ड्रगिस्ट असोसिएशन

सॅनिटायझर हे कोरोना काळात महत्त्वाचा घटक ठरले आहे. त्याचे चांगले परिणामही दिसून आले आहेत. परंतु, ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्याचा पुरवठा शासन स्तरावरून मोफत व्हावा.

- अनिल कळकुंबे, नागरिक

कोरोनामध्ये केवळ सॅनिटायझरच वापरावे असे महत्त्वाचे नाही नियमितपणे साबनाने हात धुतल्यास त्याचाही चांगला परिणाम आरोग्यावर होतो. सॅनिटायझर हा एक ठोस पर्याय आहे. तो सहज उपलब्ध करून द्यावा.

- संजय हिवरेकर, नागरिक

Web Title: Corona grew in the district; Sanitizer use, however, declined!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.