कोरोना आला, इतर आजार मात्र गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST2021-01-08T05:39:13+5:302021-01-08T05:39:13+5:30

जालना : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्णालयात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली. महिन्याकाठी साधारणत: ...

Corona came, but other ailments were gone! | कोरोना आला, इतर आजार मात्र गेले!

कोरोना आला, इतर आजार मात्र गेले!

जालना : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्णालयात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली. महिन्याकाठी साधारणत: दहा हजार रुग्णसंख्येत घट झाली. विशेष म्हणजे, रुग्णालयात गेल्यानंतर कोरोनाचे संक्रमण होईल, या भीतीने अनेकांनी रुग्णालयात न जाता घरगुती उपचारावर भर दिल्याचे चित्र आहे.

जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या दैनंदिन सरासरी सातशे ते आठशेच्या आसपास आहे. महिन्याकाठी सरासरी १८ ते १९ हजार रुग्ण रूग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत होते. मात्र, कोरोनाचा शिरकाव झाला आणि ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची संख्या सरासरी पाच हजारांवर आली. विशेषत: कान, नाक, घसा, ताप आदी आजारांच्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. विशेषत: सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे रुग्णालयात गेलो तर तपासणी होईल किंवा संशयित म्हणून अलगीकरणात टाकले जाईल, अशा भीतीने अनेकांनी घरगुती उपचार घेण्यावर भर दिला. काही रुग्णांनी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार करण्यावर भर दिल्याचेही दिसून येत आहे. एकीकडे बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्येत घट झाली आहे. नोव्हेंबरपासून रुग्णालयात उपचारास येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात रुग्णालयातील ओपीडीत आठ हजारांवर रुग्णांनी उपचार घेतले.

इतर आजारांपेक्षा कोरोनाचीच अधिक भीती

सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची असलेली लक्षणे, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना कोरोनामुळे असलेला धोका हा अनेकांच्या मनात घर करून बसला होता. त्यामुळे खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेणे किंवा सर्दी, खोकला, तापावर घरगुती उपचार करण्यावर भर दिला आहे. सध्या विविध आजारांचे रुग्ण वाढत असले तरी कोरोनामुळे शासकीय रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या घटली आहे.

ओपीडीमधील संख्या

२०२० २०१९ २०१८

जानेवारी १८३०७ २३०२७ २४८१५

फेब्रुवारी २०००१ १९४२० २३४९९

मार्च १७९२५ १८८०४ १८९२१

एप्रिल १६२६५ १५६५८ ०५१४५

मे १६९६२ १६६४३ ०३५८०

जून १६८५३ १७३३८ ०४०८७

जुलै २१००० २४८३६ ०८३९६

ऑगस्ट २०२१४ २३३७४ ०५०२१

सप्टेंबर २२२१८ २३४४७ ०५५२१

ऑक्टोबर २३९३४ २२१७० ०५८८६

नोव्हेंबर १७२०१ २४९१७ ०६५७०

डिसेंबर १८५४७ २४४७९ ०८२५९

Web Title: Corona came, but other ailments were gone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.