कोरोना विस्फोट, १३७ जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST2021-02-23T04:47:16+5:302021-02-23T04:47:16+5:30

जालना : गत आठवड्यापासून वाढणारा कोरोनाचा आलेख वाढतच असून, सोमवारी जिल्हाभरात तब्बल १३७ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ...

Corona blast kills 137 | कोरोना विस्फोट, १३७ जणांना बाधा

कोरोना विस्फोट, १३७ जणांना बाधा

जालना : गत आठवड्यापासून वाढणारा कोरोनाचा आलेख वाढतच असून, सोमवारी जिल्हाभरात तब्बल १३७ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्या पाच जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील ६२ जणांचा समावेश आहे.

बाधितांची संख्या पाहता जालना शहरातील ६२, सावरगाव- १, बठण- १, जामवाडी- १, नांदापूर- १, मंठा जयपूर- २, लावणी येथील दोघांना बाधा झाली आहे. परतूर शहरातील ८, वाटूर फाटा ४, घनसावंगी तालुक्यातील राठी अंतरवाली- १, अवलगाव- २, अंबड शहर- ३, बरसवाडा येथील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बदनापूर शहर- १, जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव उगले -१, शिराळा -१, निवडुंगा -१, सावंगी येथील दोघांना बाधा झाली आहे. भोकरदन शहरातील १९ रुग्णांचा समावेश असून, जयदेववाडीत १४ रुग्ण आढळले आहेत. राजूर येथे एक, बुलडाणा जिल्ह्यातील सहा तर अँटीजेन तपासणीद्वारे १८ अशा एकूण १३७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बाधितांची संख्या १४ हजारावर

जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ हजार ६६५ वर गेली असून, त्यातील ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर १३ हजार ७३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

५४९ जणांवर उपचार

जिल्ह्यात आजवर २०५२० संशयित आढळून आले असून, १ लाख २९ हजार ८०५ स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. बाधितांपैकी ५४९ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ३७५ अहवालांची प्रतीक्षा आहे.

सूचनांचे पालन हाच पर्याय

कोरोना रूग्णांची संख्या जिल्ह्यात विशेषत: शहरात वाढत आहे. रूग्णसंख्या वाढत असली तरी नियम धाब्यावर बसवून बाजारात फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोरोनाला अटकाव घालण्यासाठी सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. शिवाय प्रशासनानेही धडक कारवाई मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

Web Title: Corona blast kills 137

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.