दोघांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:36+5:302021-09-06T04:34:36+5:30
जालना : जिल्ह्यातील दोघांचा कोरोना तपासणीचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या तीन जणांना रविवारीच रूग्णालयातून घरी ...

दोघांना कोरोनाची बाधा
जालना : जिल्ह्यातील दोघांचा कोरोना तपासणीचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या तीन जणांना रविवारीच रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या समाधानकारकरित्या घटली आहे. जिल्ह्यात एकूण १३६ जणांच्या तपासणीचा अहवाल रविवारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यात जालना शहरातील दोघांचा समावेश आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्या तीन जणांनाही रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या केवळ १२ सक्रिय रूग्ण असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर संस्थात्मक अलगीकरण केंद्रात एकही रूग्ण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६१ हजार ७१० वर गेली असून, आजवर ११८९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० हजार ५०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.