देऊळगाव राजा येथे कोरोना जनजागृती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST2021-02-05T07:58:48+5:302021-02-05T07:58:48+5:30

देऊळगाव राजा : जिल्हा माहिती अधिकारी व जनसंपर्क कार्यालय बुलडाणा अंतर्गत स्व. शाहीर दुर्गादास दांडगे कला संस्थेच्यावतीने कोरोनाबाबत जनजागृती ...

Corona Awareness Program at Deulgaon Raja | देऊळगाव राजा येथे कोरोना जनजागृती कार्यक्रम

देऊळगाव राजा येथे कोरोना जनजागृती कार्यक्रम

देऊळगाव राजा : जिल्हा माहिती अधिकारी व जनसंपर्क कार्यालय बुलडाणा अंतर्गत स्व. शाहीर दुर्गादास दांडगे कला संस्थेच्यावतीने कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली.

२६ जानेवारी ते ३० जानेवारीदरम्यान देऊळगाव राजा तालुक्यातील अंधेरा, पाडळी शिंदे, नागणगाव, देऊळगावमही, धोत्रा, नंदा, मेव्हना राजा, टाकरखेड, भागिले वाकी खुर्द, दगडवाडी आदी गावांत जनजागृती करण्यात आली. नियमित मास्क वापरणे, वारंवार हात धुणे यांसह शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यात कलावंत शाहीर हरिदास खाडेभराड, शाहीर प्रमोद दांडगे, ढोलकी वादक शाहीर लक्ष्मण पालकर, सह-कलाकार शाहीर पुरुषोत्तम दांडगे, ज्ञानदेव रत्नपारखी, अरुण गिरी, रामदास बनसोडे, शाहीर ज्ञानेश्वर सानप, शिवाजी तेंजनकर, समाधान आव्हाड, उषा दांडगे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Corona Awareness Program at Deulgaon Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.