शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाला काँग्रेसचे ‘बळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:45 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरूवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर शेतकऱ्यांनी औरंगाबाद- बीड राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले.अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, राष्ट्रीयकृत बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योग, आरोग्य, शिक्षणातील प्रश्न यासह इतर विविध विषयावर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शासनाने तातडीने शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, पंजाब अँड महाराष्ट्र बँक अडचणीत आल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहेत. या गुंतवणूकदारांना नुकसानभरपाई द्यावी, केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे.केंद्र शासनाच्या सर्व क्षेत्रातील गैरव्यवहारांमुळे ही मंदीची लाट आली असून, २०१०-११ मध्ये १०.८ असलेला जीडीपी २०१९ मध्ये ५ टक्क्यांवर आला आहे.अनेक कंपन्या बंद पडल्याने दोन लाख कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा आली आहे. आरोग्य क्षेत्रातील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.बेरोजगारीने ४५ वर्षांचा उच्चांक मोडला आहे. शासनाने शेतकरी, गरीब, मागास, अल्पसंख्याकांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत, जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतक-यांसोबत आंदोलन केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहूल देशमुख व पदाधिका-यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, जालना- औरंगाबाद महामार्गावरील खड्डे बुजवावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.या आंदोलनात आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, संजय पाटील, माजी आ. धोंडीराम राठोड, कल्याण दळे, आर. आर. खडके, विजय जºहाड, नबाब डांगे, महेमूद शेख, एकबाल कुरेशी, भीमराव डोंगरे, फकिरा वाघ, विमल पाटील, प्रमिला सूर्यवंशी, शहाजहाँ शेख, प्रा. रंगनाथ खेडेकर यांच्यासह शहरासह जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.शेतक-यांना तातडीने मदत द्या : अर्धा तास वाहतुकीचा खोळंबावडीगोद्री / जामखेड : परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाबद्दल तातडीने शेतक-यांना मदत द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी बीड- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मागण्यांचे निवेदन पोउपनि हनुमंत वारे यांना देण्यात आले.यावेळी पांडुरंग गटकळ, मुजीब पटेल, बबन मंडलिक, राजू जायभाये, मदन जायभाये, प्रभाकर पाटोळे, अर्जुन जायभाये, छगन हाजारजे, भानुदास सिरसाठ, नवनाथ जायभाये, विष्णू भिंगारे, रुस्तुम पठाण, इम्रान पठाण, रामेश्वर मैंद, गजानन जायभाय, मकसूद पठाण, मुबारक पठाण, भगवान वैद्य, रमेश मंडलिक, गफूर पठाण, विकास भिंगारे, हरिभाऊ खंडागळे, विकास भिंगारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेसFarmerशेतकरीJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना