काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:01+5:302021-02-05T08:00:01+5:30
यावेळी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके म्हणाले की, देशाची लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता धोक्यात आलेली आहे. देशाला ...

काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन
यावेळी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके म्हणाले की, देशाची लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता धोक्यात आलेली आहे. देशाला महात्मा गांधी यांच्या विचाराची खरी गरज असताना केंद्रातील भाजपा सरकार गांधींच्या विचाराविरुध्द धोरण आखत असल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद म्हणाले की, प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यात आलेला आहे. केंद्रातील भाजप सरकार हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी विविध षडयंत्र करीत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याय आणि अत्याचाराचा निषेध करण्यात आला.
या प्रसंगी शरद देशमुख, सय्यद करीम, चंद्रकांत रत्नपारखे, मोहन इंगळे, राजू पवार, रहीम तांबोळी, हरीश आंनद, अंकुश गायकवाड, माणिक चव्हाण, गणेश शेलार, प्रकाश जगताप, ऐतेशाम मोमिन, इम्रान बिल्डर, गोपाल मालोदे, सुनील घोरपडे, जाँर्ज उगले, अनस चाउस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.