शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नगर विकास खात्याच्या असहकारावरून काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 16:01 IST

आमदार कैलास गोरंट्याल यांची नगर विकास खात्याचे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार

ठळक मुद्देनगर विकास खात्याकडून काँग्रेसच्या आमदारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे आम्ही ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत

जालना : शहरासह मतदार संघाच्या विकासासाठी नगर विकास खात्याकडे वारंवार निधीची मागणी करण्यात आली. काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने पाठपुरावा केला. मात्र, मागणीनुसार निधी काही मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेसमधील आमदार नाराज असून, या नाराजीचा विस्फोट केव्हाही होऊ शकतो, असा सूचना वजा इशारा जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला.

जालना नगर पालिकेला स्वच्छ भारत अभियानात देशात २२ वा, लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नगर पालिकेने ७५ टक्के काम केल्यानंतर ही रँकींग मिळाली आहे. भविष्यात १०० टक्के काम करून रँकींग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले. शहर आणि मतदार संघाच्या विकासासाठी काँग्रेस आमदारांनी राज्याच्या नगर विकास खात्याकडे वेळोवेळी निधीची मागणी केली आहे.

निधीसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, नगर विकास खात्याकडून काँग्रेसच्या आमदारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ही बाब आम्ही आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांना सांगितली आहे. नगर विकास खात्याकडून सहकार्य मिळत नसल्याची बाब मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचीही भेट घेऊन सांगितली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. कोरोनामुळे निधीची अडचण आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे आम्ही ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहोत. मात्र, मागणीनुसार विकास कामांसाठी निधी न मिळाल्यास आमच्या नाराजीचा विस्फोट केव्हाही होऊ शकतो, असा सूचना वजा इशारा यावेळी आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी दिला.

टॅग्स :JalanaजालनाfundsनिधीChief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेस