शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

काँग्रेस, राष्ट्रवादीवर बरसले नड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:23 IST

विरोधक स्वत:चा स्वार्थ पाहतात असा घणाघाती आरोप भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बुधवारी येथे आयोजित महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत केला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्धे नेते जेलमध्ये असून, अर्धे नेते जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत, आम्ही प्रथम देश आणि नंतर पक्षाला महत्त्व देणारे असून, विरोधक मात्र, प्रथम स्वत:चा स्वार्थ पाहतात असा घणाघाती आरोप भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बुधवारी येथे आयोजित महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत केला. याचवेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचा नामोल्लेख न करता, चाचा-भतीजाचे राजकारण कसे चालते यावर टिपणी करतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आता कलम ३७० रद्द केल्या प्रकरणी उपरती झाल्याचे नड्डा यांनी यावेळी नमूद केले.भाजपची महाजनादेश यात्रा बुधवारी सायंकाळी जालन्यात दाखल झाली. येथील डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या मैदानावर यात्रेनिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यावर नड्डा हे प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पहिल्यांदा जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी ७५ दिवसात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखला, तसेच काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतल्याचे सांगून त्यामुळे तेथील जनतेचा विकास होऊन भारतीय राज्य घटनेतील आरक्षण तेथे लागू होणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भ्रष्टाचार मुक्त करून चौफेर विकास साधल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.यावेळी त्यांनी युनोमध्ये ज्यावेळी काश्मीरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितल्यावर खा. राहुल गांधी यांना आपण पाकिस्तानची भाषा बोलत असल्याची उपरती झाली, आणि नंतर त्यांनी हा आमच्या देशाअंतर्गतचा मुद्दा असल्याचे मान्य करत केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवल्याचे नड्डा यांनी सांगितले. ज्यावेळी संसदेत ३७० कलम रद्द झाले होते, त्यावेळी काँग्रेसने केवळ व्होटबँकेला धक्का लागू नये म्हणून त्याला विरोध केल्याचा आरोपही नड्डा यांनी केला. मोदींनी मुस्लिम महिलांसाठी डोकेदुखी असलेला तिहेरी तलाकचा मुद्दा निकाली काढल्याने त्यांच्या वरील अन्याय दूर झाल्याचे सांगितले. आयुष्यमान योजनेचे कौतुक हे परदेशात होत असल्याचे सांगून यामुळे आता पर्यंत ४२ लाख लोकांना त्याचा लाभ झाल्याचा दावा केला. तसेच जालन्यातील ड्रायपोर्टचे काम ७० टक्के झाल्याचे सांगून, जालन्यातील बियाणे उद्योगात १८० कोटी रूपयांची गुंतवणूक झाल्याचेही सांगितले. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीही विचार मांडले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा व्यासपीठावर येऊन सत्कार केला.कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव, सुरजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, उद्योजक किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल, देविदास देशमुख, सिध्दीविनायक मुळे आदींची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी केले.महाजनादेश यात्रेतून आम्ही केलेला विकास जनतेसमोर मांडत आहोत, लोकसभे प्रमाणेच विधानसभेतही जनता आम्हाला आशीर्वाद देईल, असा विश्वास व्यक्त करून मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी सिंचनासह पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी भरीव निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. मराठवाडा वॉटरग्रीडसाठी चार हजार कोटी रूपयांची निविदा निघाली असल्याचे सांगितले.कोकणातील समुद्रात वाहून जाणारे २५ टीएमसी पाणी देखील गोदावरीत वळवून दुष्काळावर मात करू, असे ते म्हणाले. पाच वर्षातील आमचा विकास आणि आघाडी सरकारचा पंधरा वर्षातील विकास याची तुलना होऊच शकत नसल्याचा दावा त्यांनी केला. विविध अनुदानातून शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी रूपये दिल्याचे त्यांनी सांगितले. जालन्यासाठी तुम्ही कितीही निधी मागा, आमची तिजोरी कधीही उघडीच राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.विरोधकांच्या यात्रेला प्रेतयात्रेचे रूप : दानवेकेंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात जी कामे केली आहेत, ती जनतेपर्यंत नेण्यासाठी आमची महाजनादेश यात्रा आहे. परंतु या यात्रेला विरोध करण्यासाठी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या यात्रा काढल्या आहेत, त्यांना प्रेतयात्रेचे स्वरूप आले असल्याची गंभीर टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी करून त्यांच्या यात्रांची खिल्ली उडवली. महाराष्ट्रासह जालन्याच्या विकासासाठी हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी आणून रस्ते, पाणीयोजना तसेच अन्य विकास कामे केल्याचे दानवे यांनी यावेळी नमूद केले. आगामी काळात चौदाशे एकरवर जालन्याचा विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील ८१ कोटी गरीब जनतेला केवळ दोन रूपये किलोने गहू आणि तांदूळ आम्ही देत असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाPoliticsराजकारण