आरोग्यमंत्री टोपे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST2021-01-13T05:20:03+5:302021-01-13T05:20:03+5:30

जालना येथील माजी आ. अरविंद चव्हाण यांनी टोपे यांची सफरचंदांनी तुला केली, तर स्व. अंकुशराव टोपे महाविद्यालयत नवीन इमारतीचे ...

Congratulations to Health Minister Tope | आरोग्यमंत्री टोपे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

आरोग्यमंत्री टोपे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

जालना येथील माजी आ. अरविंद चव्हाण यांनी टोपे यांची सफरचंदांनी तुला केली, तर स्व. अंकुशराव टोपे महाविद्यालयत नवीन इमारतीचे भूमिपूजन रोजेश टोपे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, उद्योजक घनशाम गोयल, नरेंद्र अग्रवाल, संजय दाड, शहराध्यक्ष नंदकुमार जांगडे, आदींची उपस्थिती होती. या व्यतिरिक्त जिल्हाभरात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. त्यात प्रामुख्याने परतूर येथे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. लाल बहादूर शास्त्री विद्यालयात मुला- मुलींना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कपिल आकात, माजी उपनगराध्यक्ष विजय राखे, राष्ट्रवादीचे खय्यूम खान, डॉ. प्रमोद जगताप, अखिल काजी, गवळी, अफरोजभाई, पर्यवेक्षक अनिल सोनपावले, मुख्याध्यापक वसंत सवने, आदींची उपस्थिती होती.

तीर्थपुरी येथेही आयोजित नेत्र तपासणी शिबिरात ३०० रुग्णांची नेत्र तपासणी, तर १०५ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली. तसेच तीर्थपुरीतील कर्मवीर अंकुशराव टोपे क्रीडा संकुलावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी समर्थ कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, सरपंच शैलेंद्र पवार, तात्यासाहेब चिमणे, श्रीकृष्ण बोबडे, मेहेरनाथ बोबडे, सरपंच गजानन पघळ, विनायक चीमणे, सतीश पवार, आदींची उपस्थिती होती.

Web Title: Congratulations to Health Minister Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.