वेतन अधीक्षक कार्यालयात सावळागोंधळ; शिक्षकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST2021-08-24T04:34:03+5:302021-08-24T04:34:03+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांचे जीपीएफ संदर्भातील रजिस्टर अद्ययावत न करणे तसेच २०१७ पासून ...

वेतन अधीक्षक कार्यालयात सावळागोंधळ; शिक्षकांची निदर्शने
मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांचे जीपीएफ संदर्भातील रजिस्टर अद्ययावत न करणे तसेच २०१७ पासून याकडे दुर्लक्ष केले जात असून, शालार्थमधील सीएनपी प्रणालीत नोंद घेतली जात नाही तसेच वेतनवाढ देतानाचे प्रस्ताव दुर्लक्षित केले जातात. माहिती विचारण्यासाठी या कार्यालयात गेल्यावर चुकीची माहिती देऊन आमचा वेळ घेऊ नका, असे सांगून नागरिकांना काढून दिले जाते, असाही आरोप निवेदनात केला आहे.
सोमवारी चार वाजण्याच्या दरम्यान शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेसमोर एकत्रित येत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे ज्ञानोबा वरकट्टे, गौतम शिंदे, मधुकर काकडे, प्रेमदास राठोड, डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ. पुरुषोत्तम जुने, रमेश आंधळे, नारायण मुंडे, विलास घाडगे, भागवत काकडे, आरेफ कुरेशी, महेश म्हात्रे, रवी मुळे, भरत डावकर, मधुकर गायकवाड, प्रा. राजक्रांती वलसे आदींची यावेळी उपस्थिती होती.