रायगव्हाण येथील सप्ताहाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:07+5:302021-02-05T08:04:07+5:30
स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी जालना : शहरातील मातोश्री रमाबाईनगर, आदर्शनगर, जयनगर, आनंदनगर भागात स्मशानभूमी नाही. त्यामुळे अंत्यविधीसाठी नागरिकांची गैरसोय ...

रायगव्हाण येथील सप्ताहाची सांगता
स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी
जालना : शहरातील मातोश्री रमाबाईनगर, आदर्शनगर, जयनगर, आनंदनगर भागात स्मशानभूमी नाही. त्यामुळे अंत्यविधीसाठी नागरिकांची गैरसोय होत असून, या भागातील स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी दलित पँथर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष गौतम वाघमारे, बाबासाहेब गाेडगे, विलास भिंगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ
जाफराबाद : येथील नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरातील शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक विक्रम मांडुरके, कारभारी सपाटे, देविदास धांडगे, योगेश्वर सपाटे, राजू भास्कर, शहर समन्वयक नीलेश कवडी, गणेश चव्हाण, राजू वजीर, विष्णू कदम आदींची उपस्थिती होती.
पिकांच्या वाढीव भावासाठी कायदा करा
अंबड : शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, पिकाला खर्चापेक्षा वाढीव ५० टक्के भाव मिळावा, असा कायदा करावा, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. उत्पदित मालाला कमी भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांची आर्थिककोंडी होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर देवानंद चित्राल, लहू धाईत, कठाळू दशरथ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.