आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST2021-09-07T04:35:47+5:302021-09-07T04:35:47+5:30

भाले यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार जालना : अमृत कलश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष मधुकर ...

Concluding the fast after the assurance | आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

भाले यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार

जालना : अमृत कलश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष मधुकर भाले यांना सेवक सेवाभावी संस्था जळगाव यांच्यातर्फे कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात डॉ. भाले यांनी जालना शहरात अमृत कलश संस्थेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून मार्गदर्शन केले.

अहंकार देऊळगाव येथे विद्यार्थ्यांची तपासणी

जालना : तालुक्यातील पिरकल्याण केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहंकार देऊळगाव येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. अंकुश डोंगरे, डॉ. सचिन दहिवाल, दुगेश थेटे यांच्या पथकाने ही तपासणी केली. या वेळी अहंकार देऊळगावचे मुख्याध्यापक सिद्धार्थ गजभिये, प्रकाश मानसुरे, संतोष खरात, सुशीला भोरजार, सीमा उबाळे, विकास सोनुने आदी उपस्थित होते.

बनकर यांची निवड करण्याची मागणी

जाफराबाद : जाफराबाद तालुका संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी सातेफळ येथील ॲड. रामकृष्ण बनकर यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी बळीराम शिंदे, बाबासाहेब जाधव, शिवाजी बनकर, एकनाथ बुरकुल, कृष्णा कोरडे, शिवाजी सवडे, योगेश सवडे, विठ्ठल सवडे, शुभम घोडसे, बाळू बनकर, शेख सईद, शेख समीर, फिरोज शेख, समाधान पंडित, अर्जुन जगताप, अनंत बनकर, बाबासाहेब जगताप, राजू गवई, राजू घोडके, सतीश बनकर, संदीप हिवाळे, नीलेश लोखंडे, जाकेर शेख, नाजीम कुरेशी आदींनी केली आहे.

मटका खेळताना एकास पकडले

अंबड : जालना महामार्गावरील पेट्रोलपंपाजवळील हॉटेललगत शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जुगार खेळताना व खेळविताना संशयित सुनील बाबुराव राऊत (रा. माळीगल्ली) यास पकडले. त्याच्याकडे २ हजार ६८० रुपये, जुगाराचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या व साहित्य आढळून आळे. या प्रकरणी पोलीस नाईक देवीदास भोजने यांंनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

कर्जत येथे ड्रोनने पीक फवारणी प्रात्यक्षिक

अंबड : तालुक्यातील कर्जत येथे कृषी विज्ञान केंद्र बदनापूर व गरुडा एअरो स्पेस प्रा.लि. चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग म्हणून ड्रोनचा वापर करून कपाशी, सोयाबीन व तूर पिकांवर कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतात दाखविण्यात आले. या प्रात्यक्षिकादरम्यान ड्रोनद्वारे फवारणी केल्यास होणारे फायदे जसे की, वेळेची, श्रमाची व रोजगारांची बचत कशी होते याबाबत सविस्तर माहिती तज्ज्ञ कार्तिक रंगराजन यांनी दिली. या वेळी शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सोमवंशी, प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील यांची उपस्थिती होती.

अर्बन ट्री क्लस्टर अभियानाचा शुभारंभ

जालना : संत निरंकारी मिशनद्वारे अर्बन ट्री क्लस्टर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी संचालक विजय बोडखे, राजकुमार परसवाणी, संपतराव काटोले, शिवाजी मुजगुले, राजेश राऊत, छाया वाघमारे हे हजर होते.

Web Title: Concluding the fast after the assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.