सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:35 IST2021-01-16T04:35:20+5:302021-01-16T04:35:20+5:30
भोकरदन : सेवानिवृत्त वेतनाची थकबाकी व इतर लाभ मिळण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर दोन दिवसांपासून आमरण उपोषण ...

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणाची सांगता
भोकरदन : सेवानिवृत्त वेतनाची थकबाकी व इतर लाभ मिळण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते. नगराध्यक्षा मंजुषा देशमुख, राजाभाऊ देशमुख, नगरसेवक दीपक बोर्डे, कार्यालयीन अधीक्षक वामन आडे यांनी तातडीने मागणी मान्य केल्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
चांद्रभागाबाई पगारे, भिकाबाई पगारे, केसरबाई बिरारे, सुदाम पगारे, दादाराव उजागरे, शांताबाई जाधव, यमुनाबाई पगारे, निरंजन साळवे यांनी १२ जानेवारी रोजी उपोषण सुरू केले होते. १३ रोजी नगराध्यक्षा मंजुषा देशमुख, कार्यालयीन अधीक्षक वामन आडे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, नगरसेवक दीपक बोर्डे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या खात्यात लगेच ३०,००० रुपये टाकण्यात येईल, असे आश्वासन दिले.