बेड उपलब्धतेबद्दल रुग्ण, नागरिकांमध्ये चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:54+5:302021-04-01T04:30:54+5:30
बेड मिळण्यासाठी तेथे अक्षरश: भाऊगर्दी झाली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. परंतु नंतर तेथील परिचारिका तसेच डॉक्टरांनी येऊन ...

बेड उपलब्धतेबद्दल रुग्ण, नागरिकांमध्ये चिंता
बेड मिळण्यासाठी तेथे अक्षरश: भाऊगर्दी झाली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. परंतु नंतर तेथील परिचारिका तसेच डॉक्टरांनी येऊन संयमाने घेण्याचे आवाहन केले. बेडची कमतरता असल्याने समजून घेण्याचे आवाहन केले. परंतु अनेकजण खोकला तसेच दम लागत असल्याने खाली बसल्याचे दिसून आले. येथे विचारपूस केली असता, आयसीयू पूर्ण क्षमतेने सुरू आहे. त्यातच अचानक रुग्ण संख्या वाढल्याने ही तारांबळ उडाल्याचे सांगण्यात आले.
एकीकडे शासनाकडून दररोज जी आकडेवारी दिली जात आहे. त्यानुसार जिल्हा आणि शहरात मोठे बेड उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. काही खासगी हॉस्पिटलमध्येही आयसीयूतील बेडसाठी अनेकांना वाट पहावी लागत होती. तोपर्यंत रुग्णाला रूग्ण वाहिकेतच ठेवून ऑक्सिजन पुरवठा केला जात असल्याचेही दिसून आले. सिटीस्कॅन करण्यासाठीदेखील शहरातील सर्व केंद्रांवर गर्दी होती. रेमडिसिवरचे दर पाच ते सात हजार रुपयांवरून खाली आल्याने त्याचा लाभ रुग्णांना होत असल्याचे दिसून आले.
दुसऱ्याला सुटी मिळाल्यास बेड मिळेल...
येथील एका खासगी रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी एका ग्रामीण भागातील व्यक्तीला व्हेंटिलेटरची गरज होती. परंतु आयसीयूत एकही बेड शिल्लक नसल्याचे दिसून आले. त्यातच एका अत्यवस्थ रूग्णाला सुटी देण्यात येणार आहे. तोपर्यंत थांबा असे सांगण्यात आले. यामुळे खासगी आणि सरकारी रूग्णालयातील व्यवस्थापन अतिताण आल्याने कोलमडत असल्याचे दिसून आले.
चौकट
डॉक्टर, परिचारकांचे जीवापाड प्रयत्न
मार्चमध्ये कोरोनाची मोठी लाट आल्याने यंत्रणेवर ताण आला आहे. अशाही स्थितीत जिल्हा प्रशाससन आणि आरोग्य यंत्रणा या आपला जीव धोक्यात घालून जे अतिशिय गंभीर रूग्ण आहेत. त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रीत करत आहेत. तर कमी गंभीर रुग्णांकडे त्यामुळे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नसल्याने त्यांचे म्हणणेन आहे. असे असले तरी अनेक डॉक्टर आणि परिचारिका तसेच तेथील वॉर्डबॉय हे दिवस-रात्र एक करून उपचारासाठी आणि कोरोना रूग्णांना दिलासा देण्याचे काम ते करत असल्याचे चांगले अनुभवही अनेकांनी यावेळी व्यक्त केले.
चौकट
स्चच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी
जालन्यातील जिल्हा रुग्णालयात काही वाॅर्डात स्वच्छतेकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नसल्याचा रूग्ण तसेच रूग्णांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. त्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश देहडकर यांनी या बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र लिहून स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याची मागणी केली होती. लगेचच त्याची दखल घेते जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सूचना दिल्याचे देहेडकर यांनी सांगितले.