जलयुक्तची कामे पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:27 IST2018-01-21T00:26:23+5:302018-01-21T00:27:02+5:30
जलयुक्त शिवार अभियान ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची कामे जूनपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिले.

जलयुक्तची कामे पूर्ण करा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जलयुक्त शिवार अभियान ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची कामे जूनपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी डवले यांनी मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मनरेगा कामांचा संबंधित अधिका-यांकडून आढावा घेतला. डवले म्हणाले, पडणाºया पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्याबरोबर तो उपयोगात आणण्याची गरज आहे. जलयुक्तच्या कामांमध्ये पारदर्शकता राहावी प्रत्येक कामाचे जिओटॅगिंग करण्यात यावे. चालू वर्षातील नव्याने हाती घेण्यात आलेली कामे निकषानुसार सर्व बाबींची पूर्तता करुनच पूर्ण करावी. जलसंधारणाच्या दुरुस्तीच्या कामास मान्यता देण्यापूर्वी संबंधित यंत्रणेच्या अधिका-यांनी त्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करुनच त्या कामांना परवानगी द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.