शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

‘वॉटर ग्रीड’सह प्रकल्पांची कामे पूर्ण करा : तज्ज्ञांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:45 IST

शासनाने मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असा सूर जालना येथे रविवारी आयोजित वॉटर ग्रीड परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हजारो कोटी रूपयांचा वॉटर ग्रीड प्रकल्प राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी शासनाने मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असा सूर जालना येथे रविवारी आयोजित वॉटर ग्रीड परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी काढला. मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष शिल्लक असून, सिंचनाच्या प्रश्नावर तालुकानिहाय चर्चा व्हावी. वॉटर ग्रीडबाबतचे समज-गैरसमज दूर करावेत, अशी अपेक्षा कृषिभूषण विजय बोराडे यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केली.मराठवाडा वॉटर ग्रीड परिषदेतर्फे जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी मराठवाडा पातळीवरील मराठवाडा वॉटर ग्रीड परिषद घेण्यात आली. कृषिभूषण विजय बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित परिषदेस महाराष्ट्र सिंचन सहयोगाचे उपाध्यक्ष प्रा. बापू अडकिणे, वाल्मीचे माजी सहसंचालक डॉ. एस. बी. वराडे, पाणी प्रश्नाचे अभ्यासक राजेंद्र दाते-पाटील, राजन क्षीरसागर, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य शंकर नागरे, जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना प्रा. पुरंदरे म्हणाले, मराठवाड्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी इस्त्राईलच्या मदतीने मराठवाडा वॉटर ग्रीड हा तब्बल २५ हजार कोटी रुपये किंमतीचा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र शासनाने हाती घेतला आहे. वॉटर ग्रीडची देखभाल, दुरुस्ती व संरक्षण आणि जलशयातून होणारा अमर्याद उपसा हे कळीचे मुद्दे आहेत. जलयुक्तमुळे दुष्काळमुक्ती झाली असेल तर ग्रीड योजनेची गरज काय? असा सवाल उपस्थित करीत ग्रीडमुळे पाणी पुरवठा योजनांमध्ये होणारे बदल, पाणी पट्टीतील बदल लक्षात घेता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची भूमिका कळीची ठरणार आहे. या ग्रीडबाबत शासनाने गांभीर्याने पुर्नविचार करणे गरजेचे आहे. टाटाबरोबर झालेले ब्रिटीशकालीन करार रद्द करुन वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी भिमा खोऱ्यात आणि तेथून मराठवाड्यात आणण्याची गरज प्रा. पुरंदरे यांनी व्यक्त केली.अध्यक्षीय समारोपात कृषीभूषण विजय बोराडे म्हणाले, मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष शिल्लक आहे. सिंचनाच्या प्रश्नावर तालुकावार चर्चा होणे गरजेचे आहे. वॉटर ग्रीड विषयी समज, गैरसमज दूर करण्याची गरज आहे. शेतीचे, पिण्याचे पाणी उद्योगांकडे वळविले जात असून, सिंचन प्रश्नी शेतकऱ्यांनी संघटीत होणे काळाची गरज आहे. यावेळी मराठवाडा वॉटर ग्रीड परिषदेच्या स्मरणिकेचे प्रा. पुरंदरे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.प्रारंभी परिषदेचे संयोजक बी.वाय. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके, प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के, गोविंद आर्दड, अ‍ॅड. किशोर राऊत, सुधीर शिंदे, अनिल मिसाळ आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात मुख्य संयोजक कॉ. अण्णा सावंत यांनी वॉटर ग्रीड परिषदेची भूमिका मांडली. सूत्रसंचालन शिवकुमार सोळंके यांनी तर अ‍ॅड. कैलास रत्नपारखे यांनी आभार मानले.यावेळी द्वारकाभाऊ पाथ्रीकर, ज्ञानदेव पायगव्हाणे, भगवान काळे, डॉ. रमेश अग्रवाल, प्रा. नारायण बोराडे, देविदास जीगे, शिवाजी लकडे, दत्ता कदम, डॉ. आप्पासाहेब कदम, प्रा. बसवराज कोरे, डॉ. विजयकुमार कुमठेकर, डॉ. यशवंत सोनवणे, आर.आर. खडके, डॉ. रावसाहेब ढवळे, राम गायकवाड यांच्यासह शेतकरी तसेच अभ्यासक उपस्थित होते. या योजनेवर मराठवाड्यात प्रथम अशी जाहीर खुलीचर्चा झाल्याने नागरिकांना योजना कळणार आहे.योजनेबाबत सकारात्मकता ठेवावीमराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे म्हणाले, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत सकारात्मक दृष्टीकोण ठेवावा. ही एक महत्वाकांक्षी योजना असून, शासनाने ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वीत करतांना लोकसहभागास प्राधान्य देऊन पुढील कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.तरच ही योजना फलदायी होण्याचे श्रेय शासनाला मिळेल. ही वॉटर ग्रीड योजना म्हणजे मराठवाड्यातील जनतेसाठी सुवर्णसंधी असल्याचे ते म्हणाले. तर वाल्मीचे माजी सहसंचालक डॉ. एस. बी. वराडे यांनी वॉटर ग्रीड प्रकल्प सकारात्मक दृष्टीने राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजनाwater shortageपाणीकपात