अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालकपदासाठी स्पर्धा तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST2021-08-14T04:35:20+5:302021-08-14T04:35:20+5:30
दुसरीकडे काँग्रेसकडून माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहराध्यक्ष शेख महेमूद हे शर्यतीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार ...

अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालकपदासाठी स्पर्धा तीव्र
दुसरीकडे काँग्रेसकडून माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहराध्यक्ष शेख महेमूद हे शर्यतीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केल्यास माजी आ. चंद्रकांत दानवे आणि जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या पल्लवी तार्डे पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. पल्लवी तार्डे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खा. सुप्रिया सुळे यांच्या खूप जवळच्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची वर्णी नक्की समजली जात आहे. यासह परतूरचे बाजार समितीचे सभापती कपिल आकात यांचेही नाव आघाडीवर आहे. शिवसेनेकडूनही महिला आघाडीच्या सविता किवंडे यांचे नाव चर्चेत आहे. या नियुक्त्या येत्या आठवडाभरात जाहीर होणार असल्याचीदेखील जोरदार चर्चा आहे.
चौकट
जेथे भाजप तेथे अधिकचे लक्ष
शिवसेनेकडून ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तेथे शिवसेना अधिकचे लक्ष घालणार असून, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही रणनीती असल्याचे मानले जाते. परतूर येथे आ. बबनराव लोणीकर हे भाजपचे असून ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत तर दुसरीकडे बदनापूरचा विचार केल्यास तेथेही भाजपचे आ. नारायण कुचे आहेत. त्यामुळे तेथेही सेना अधिक लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येते.
चौकट
जिल्हा नियाेजन समितीकडे लक्ष
जिल्हा नियोजन समितीवर नऊ अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सदस्यांची नावे निश्चित केली आहेत. त्या नावांना राज्य सरकारची मंजुरी मिळावी म्हणून ते मुंबईला पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. त्या बंद पाकिटात कोणाची नावे आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.