शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘मुकाबला दुष्काळाचा’ मोहीम हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:30 IST

लना जिल्हा तीव्र दुष्काळाने होरपळला असून या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालना शहरातील सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने ‘मुकाबला दुष्काळाचा’ ही मोहीम सुरु केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा तीव्र दुष्काळाने होरपळला असून या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालना शहरातील सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने ‘मुकाबला दुष्काळाचा’ ही मोहीम सुरु केली.सर्वप्रथम जिल्ह्यातील ४० पेक्षा अधिक गावांचा दौरा करुन चारा, पाणी, या समस्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या भावनेतून जिल्हाप्रमुखांनी जाणून घेतल्या व आता मागील महिन्यांपासून या समस्यांवर उपाययोजना करीत आहेत. या उपाययोजना करतांना तीव्र पाणीटंचाई असणाऱ्या पाहेगाव, पारेगाव, बाजीउम्रद, मानेगाव तांडा, पोखरी सिंदखेड, राममुर्ती, वुंष्ठभेफळ, वरखेडा, वाघ्रुळ आदी गावांत पाणी समस्यांवर उपाय म्हणून बोअरवेल घेवून दिले. तसेच अनेक गावांतील जनावरांसाठी चारा, पाणी व पाणी साठविण्यासाठी २ हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्याचे वाटप करण्यात आले.या मोहिमेअंतर्गत रविवारी जालना शहरातील दानशुर उद्योजक कैलास लोया यांच्या सहकार्याने व मदतीने घेण्यात आलेल्या बोअरवेलच्या पाण्याचे जलपुजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मानेगावचे माजी सरपंच अशोक हंडे, माजी सैनिक एकनाथ हंडे, किसान राठोड, गणेश पवार, विठ्ठल पडूळ, रामधान राठोड, सुभाष राठोड, लालीराम राठोड, विठ्ठल राोड, बंडु पवार, ज्ञानेश्वर राठोड, मोहन पवार, विकास मगर, प्रल्हाद पवार, सुभाष पवार, केलास राठोड, नंदु राठोड, दिलीप राठोड, संजय राठोड, राममुर्ती येथील सरपंच कैलास गिराम, बंडु केळकर, निवृत्ती मुळे, विष्णु मगर, बाबुराव राऊत, गणेश मगर, लक्ष्मण सातपुते, जलाल मुन्नेवाले, राधाकिसन राऊत, दत्तु मगर, सत्यनारायण मगर, अशोक गिराम, संतोष राऊत, ज्ञानेश्वर राऊत, परमेश्वर चौधरी आदी गावकऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.दानाचा सदुपयोगयावेळी बोलतांना उद्योजक कैलास लोया म्हणाले की, आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी देणगी देत असतो. परंतु नंतर त्याचा वापर कसा होतो, याचे ज्ञान आम्हाला नसते. परंतु मुकाबला दुष्काळाचा या मोहिमेस मदत केल्यामुळे आम्ही दिलेले दान हे सत्पत्री गेल्याचा आनंद अनुभवयास मिळत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती काही अंशी थांबविल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, त्यांनी या उपक्रमाचे कौतूकही केले.गावक-यांना दिलासाया मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेले ७० टक्के बोअरवेल यशस्वी झाले असून, त्यावर विद्युत मोटारी बसविल्याने गावकºयांना दिलासा मिळाला आहे. अनेक गावात लहान मुले, महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती.

टॅग्स :droughtदुष्काळSocialसामाजिक