कोविड लॅबमध्ये रंगतेय मानापमानाचे नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:45+5:302021-02-23T04:46:45+5:30

जालन्यात कोविड लॅब व्हावी म्हणून मोठे प्रयत्न करून ही लॅब येथे विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली. यासाठी आरोग्यमंत्री राजेश ...

Colorful prestige drama in Covid Lab | कोविड लॅबमध्ये रंगतेय मानापमानाचे नाट्य

कोविड लॅबमध्ये रंगतेय मानापमानाचे नाट्य

जालन्यात कोविड लॅब व्हावी म्हणून मोठे प्रयत्न करून ही लॅब येथे विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली. यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अथक प्रयत्न केले होते. या लॅबमुळे १२ तासांच्या आत कोरोनाचा अहवाल मिळण्यास मोठी मदत झाली. आतापर्यंत या लॅबमधून जवळपास ८० हजारपेक्षा अधिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीसाठी मायक्रो बायोलाॅजी झालेल्या तंत्रज्ञात आणि तेथील पेथॉलॉजिस्टमध्ये या नमुन्याच्या मुद्यावरून वाद झाला. यावेळी संबंधित पॅथोलॉजिस्टकडून अपशब्द वापरले आहेत असा गंभीार आरोप केल्याने संबंधितांमध्ये वाद झाला. या संदर्भात डॉ. शेजूळ यांना विचारणा केली असता, असे आपण म्हटले नसल्याचे सांगितले.

दरम्यान, तंत्रज्ञ गिरीश कांबळे ‘लोकमत’शी बोलतांना म्हणाले की, आपण शेजूळ यांच्या वैयक्तिक वादातून नमुना (सॅम्पल) विषयी आक्षेप घेतले नाहीत. परंतु जो विषय आपल्याला कळतो त्याबद्दल आपण त्यांना सल्लावजा सूचना केली. परंतु ही सूचना केल्यावर त्यांनी आपल्याशी अपशब्द वापरल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. दरम्यान, या लॅबमध्ये खासगी तज्ज्ञ डॉ. सूर्यकांत हयातनगरकर हे जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. त्यामुळे मी सॅम्पल ॲनालिससची जबाबदारी पार पाडून शासनास सहकार्य करण्यास तयार आहे. परंतु मला तसेच पत्र जबाबदार यंत्रणांनी द्यावे तरच ते मला करता येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

सॅम्पलविषयी शंका घेण्यास वाव नाही

डॉ. शेजूळ आणि मायक्रोबायोलॉजिस्ट गिरीश कांबळे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप हे काम करताना झालेले आहेत. त्याचा कुठलाही परिणाम कोरोनाचे नमुने (सॅम्पल) तपासणीसह अहवालावर झाला नाही. जे वास्तव अहवाल आहेत, तेच आम्ही जाहीर करतो. तसेच या दोघांमधील वाद सोडविण्यासाठी आपण या सर्व टीमला सोमवारी आपल्या दालनात बोलावून वादावर तोडगा काढणार आहोत.

अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना

Web Title: Colorful prestige drama in Covid Lab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.