मंठ्यात रंगले बहारदार कविसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:37+5:302021-02-05T08:00:37+5:30
या कविसंमेलनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कवी डॉ.प्रभाकर शेळके तर प्रमुख उपस्थितांमध्ये प्रा.डॉ.सदाशिव कमळकर, प्रा.डॉ. ...

मंठ्यात रंगले बहारदार कविसंमेलन
या कविसंमेलनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कवी डॉ.प्रभाकर शेळके तर प्रमुख उपस्थितांमध्ये प्रा.डॉ.सदाशिव कमळकर, प्रा.डॉ. बापू सरवदे, प्रा.अशोक खरात यांची उपस्थिती होती. निमंत्रित कवी म्हणून प्रा.के.डी. वाघमारे, प्रा.प्रदीप देशमुख, पु.ना. बारडकर, कवयित्री अश्विनी घोगरे यांची उपस्थिती होती. कवी संमेलनाची सुरुवात प्रा.प्रदीप देशमुख यांनी आईविषयीची महती सांगणारी कविता सादर केली. त्यांच्या ‘नावडतीची पोरं’ या कवितेने रसिकांना अंतर्मुख केले. बालकवी पु.ना. बारडकर यांनी ‘चिमणा चिमणी झाडावर शोधीत होती पक्काठेपा.. काडी काडी करून बांधला एक मोठा खोपा...’ ही कविता सादर करून बालविश्व रसिकांच्या समोर उभे केले. ज्येष्ठ कवी प्रा.वाघमारे यांनी ‘छत्र बापाचं माझ्या कळण्याआधीच हरवलं’ ही आई आणि वडिलांविषयीची कविता सगळ्यांनाच भावुक करणारी होती. कवयित्री अश्विनी घोगरे यांनी स्त्रीभ्रूणहत्येविषयीची, तसेच स्त्री जाणिवांचे तरल प्रेम काव्य सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार हरीराम तिवारी यांनीही आपली एक हिंदी रचना सादर करून राजकीय भाष्य केले. कवी संमेलनाचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ.प्रभाकर शेळके यांनी ‘बाप माझा अष्टगंध’ ही कविता सादर केली. या कवितेला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विनायक काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.के.एम.कांबळे यांनी तर आभार प्रा.चारुलता पाटील यांनी मानले. यावेळी प्रा.पांडुरंग नवल, प्रा.नेताजी मुळे, प्रा.पंढरीनाथ काकडे, प्रा.एल.टी. खालापुरे यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो
मंठा येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात कविसंमेलनाचे उद्घाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारत खंदारे व इतर.