कडवंचीत होणार शीतगृह अन् व्हेइकल दुरुस्ती केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:26+5:302021-07-14T04:35:26+5:30
जालना शहराजवळील कडवंची येथे जवळपास १५ हेक्टर गायरान जमीन संपादित करण्यात आली असून, कडवंची ही द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखली ...

कडवंचीत होणार शीतगृह अन् व्हेइकल दुरुस्ती केंद्र
जालना शहराजवळील कडवंची येथे जवळपास १५ हेक्टर गायरान जमीन संपादित करण्यात आली असून, कडवंची ही द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे येथे मोठमोठी शीतगृहे उभारण्याचा प्रस्ताव आहे. जेणेकरून द्राक्षांसह अन्य फळे आणि भाजीपाला परेदशासह मुंबईला गतीने पाठविणे शक्य होणार आहे. यासह केशर आंबा, मोसंबीसाठीदेखील हे शीतगृह वरदान ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
शीतगृहाप्रमाणेच व्हेइकेल केअर आणि दुरुस्ती केंद्रदेखील येथे उभारण्यात येणार आहे. महामार्गावर अपघात झाल्यावर ते वाहन लगेचच जेसीबी आणि अन्य वाहनांच्या मदतीने उचलून ते कडवंची येथे आणण्यात येणार आहे. येथेच फूडमॉलचाही प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
निधोना येथे इंटरचेंजचे काम सुरू
समृद्धी महामार्गावरून जालना शहरासह ड्रायपोर्टला जाण्यासाठी निधोना येथे इंटरचेंज पॉइंट तयार करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई तसेच नागपूर येथून येताना ज्यांना जालन्यात थांबायचे असेल त्यांच्यासाठी येथे हा रस्ता वळण घेणार आहे. त्याचे कामही वेगात सुरू झाले आहे.
चौकट
जालना ते नांदेड रस्त्याचे सर्वेक्षण
जालना ते नांदेड, असा नवीन मार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी जामवाडी येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गापासून हा रस्ता नांदेडसाठी जोडण्यात येणार आहे. या रस्त्याची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. त्याचे गाव नकाशे मागविण्यात आले आहेत. वाटूर, मंठा तसेच जिंतूर येथून हा मार्ग जाणार आहे. या रस्त्याचे ऑनलाइन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.