शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूरसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह धुके दाटून येत आहे. त्यामुळे या भागातील रब्बी ...

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूरसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह धुके दाटून येत आहे. त्यामुळे या भागातील रब्बी हंगामातील फुलोऱ्यात असलेल्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत असून, पिकांना मोठा फटका बसत आहे. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

यावर्षी पावसाळ्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांची वाट लागली. कपाशी, मका, सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. राजूर परिसरात यावर्षी रब्बीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके तजेलदार असताना अचानक गेल्या आठ दिवसांपासून ढग दाटून येत असून, धुके पडत असल्याने फुलोऱ्यातील पिकांना मोठा फटका बसत आहे. सध्या गव्हाला थंडीची गरज असताना धुके पडत आहेत. त्यामुळे पिके वाया जाण्याची भीती बळावली आहे. तसेच दूषित वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला असून, आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. यावर्षी आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे. परंतु, तो गळून पडत असल्याने आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिसरात गेल्या दोन वर्षांपासून फळबाग लागवड क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. धुक्यामुळे द्राक्ष बागाही धोक्यात असून, धुक्यामुळे फुलोऱ्यात असलेली ज्वारी काळी पडत आहे. रब्बीची पिके ऐन भरात असताना दूषित वातावरणामुळे ती वाया जात असल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे.