जालना पालिकेचा सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST2021-03-21T04:28:23+5:302021-03-21T04:28:23+5:30

ही बाब लक्षात घेऊन जालना पालिकेने दोन वर्षांपूर्वी सारवाडी परिसरात हा प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी करून जागा निश्चित केली होती, ...

Clear the way for Jalna Municipal Sewage Reuse Project | जालना पालिकेचा सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचा मार्ग मोकळा

जालना पालिकेचा सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचा मार्ग मोकळा

ही बाब लक्षात घेऊन जालना पालिकेने दोन वर्षांपूर्वी सारवाडी परिसरात हा प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी करून जागा निश्चित केली होती, परंतु त्या जागेच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि पालिकेत न्यायिक वाद निर्माण झाला आहे. हे कुठेतरी थांबविण्यासाठी यावर तडजोड करून पालिकेने ती वादग्रस्त जागा सोडून हा प्रकल्प उभारणीचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पातून दररोज साधारपणे एकूण पाणी वापराच्या २० टक्के पाण्याचा पुनर्वापर शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालल्यास यातून दररोज साधारपणे १२० दशलक्ष लीटर प्रक्रियायुक्त पाणी शुद्ध होऊ शकते.

हे प्रक्रिया केलेले पाणी येथील स्टील उद्योगासाठी मोठे महत्त्वाचे वरदान ठरू शकते. स्टील उत्पादकांना दररोज काही लाख लीटर पाण्याची गरज पडते. आज हे पाणी उद्योजक टँकरद्वारे वेगवेगळ्या विहिरीतून आणत आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मोठा दिलासा स्टील उद्योजकांना मिळू शकतो.

चौकट

चांगला बीओडी असल्यास पिण्यासही होईल उपयोग

सांडपाणी प्रकल्पातून औद्योगिक वापरासाठी पाणी हमखास मिळू शकते, परंतु जर अतिउच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून जर हेच पाणी अधिक चांगल्या पद्धतीने शुद्ध केल्यास ते पिण्यायोग्यही होऊ शकते, परंतु त्यासाठी त्या पाण्यातील बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड किती आहे, त्यावर अवलंबून असते. सांडपाण्यात जैविक, तसेच रासायनिक घटकांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्याने हे पाणी पिण्यायोग्य करताना खूप काळजी घ्यावी लागते.

प्रा.सुरेश कागणे, प्रा.जीवशास्त्र विभाग बारवाले महाविद्यालय

Web Title: Clear the way for Jalna Municipal Sewage Reuse Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.