पालिकेच्या ऑनलाईन सभेतही नागरी समस्या गाजल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:53+5:302021-09-09T04:36:53+5:30
परंतु हा वेळ खूप कमी असल्याने मिळालेल्या वेळात शिवसेनेचे नगरसेवक विष्णू पाचफुल यांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या मुद्यावर ...

पालिकेच्या ऑनलाईन सभेतही नागरी समस्या गाजल्या
परंतु हा वेळ खूप कमी असल्याने मिळालेल्या वेळात शिवसेनेचे नगरसेवक विष्णू पाचफुल यांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या मुद्यावर जाब विचारला. तसेच भाजपचे गटनेते अशोक पांगारकर हे सभेत मुंबईहून सहभागी झाले होते. त्यांनीदेखील शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या कंत्राटदारास विनादंड मुदतवाढ कशी दिली असा सवाल केला. स्वच्छतेसाठीच्या घंटागाड्या शहरातील बंद पथदिवे यासह कोरोना काळात प्रतिबंधित क्षेत्रासाठी अनेक भागांमध्ये लोखंडी पत्रा ठाेकून तो भाग सील केला होता. त्याचेही लाखो रुपयांचे बिले कशी अदा केली याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश राऊत यांनी देखील शहरातील एकूणच नागरी समस्यांवर अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन नार्वेकर यांना जाब विचारला. परंतु समाधानकारक उत्तर मिळू शकले नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून ही सभा सहदेह होणे आवश्यक असल्याची मागणी आपण केल्याचे ते म्हणाले. यासभेसाठी विषय पत्रिकेवर जवळपास २५ विषय होते. त्यातील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. ऑनलाईन सभेत काहीवेळ तांत्रिक व्यत्यय आल्याचेही अनेकांनी नमूद केले.
रुग्णालयातून घेतला सहभाग
पालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आमेश पाशा हे औरंगाबादेतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी तेथून या सभेत सहभाग घेऊन त्यांच्या प्रभागातील प्रश्न उपस्थित केले. याच सभेत नगरसेवक महावीर ढक्का, रमेश गौरक्षक, विजय पांगारकर, निकम, सुनील राठी यांच्यासह शाहा आलमखान, नरसेविका संध्या देठे, नगरसेवक ढोबळे हेदेखील सहभागी झाले होते.