The city of Jalna, the city of Jalna, is surrounded by 'Jay Mahavir' | ‘जय महावीर’च्या जयघोषाने दुमदुमले जालना शहर
‘जय महावीर’च्या जयघोषाने दुमदुमले जालना शहर

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना शहरात भगवान महावीर जन्मकल्याणकाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. प. पू. दिलीपकंवरजी म. सा; प. पू. सौम्यप्रज्ञाश्रीजी म. सा. यांच्या सान्निध्यात सकल जैन समाजाच्या वतीने मोठी शोभा यात्रा काढण्यात आली.
भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून सकाळी महावीर चौक येथे सकल जैन संघाच्यावतीने ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर शोभा यात्रेस प्रारंभ झाला.
सकल जैन समाज एकत्र आल्याने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शोभा काढण्यात आली. अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात निघालेली ही शोभा यात्रा शहरातील विविध मार्गाने जाऊन यांची सांगता शिवाजी पुतळ्याशेजारी असलेल्या गुरु गणेशनगर मध्ये झाली. बॅण्ड पथक हे या शोभा यात्रेचे खास आकर्षण होते. समाज बांधवांच्या वतीने शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तर सकल जैन समाजाच्या वतीने जालना शहरवासियांसाठी प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले.
शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी संजय लव्हाडे, डॉ. गौतमचंद रुणवाल, संजय मुथा, सुदेश सकलेचा, विजयराज सुराणा, विजयकुमार सकलेचा, धर्मेंद्र धोका, वीरेंद्र धोका, श्री ललवाणी, विनयकुमार आबड, उत्तमचंद बनवट, अशोक बिनायकिया, सुरेशचंद मुथा, मनोज मोदी, प्रमोद देसरडा, गौतमचंद मुनोत, विजय जैन, प्रेमचंद कासलीवाल, प्रवीण पहाडे, शिखर लोहाडे, रजत चोविश्या, विनोद पाटणी, संतोष बडजाते, जैनराज सेठीया, पवन सेठिया, माणिकचंद कासलीवाल, सुरेश मरलेचा, महावीर रुणवाल, सोमेश ठोले, योगेश पाटणी, अनिल छाबडा, सुधीर पहाडे, विजय सावजी, कन्हैया पाटणी, हसमुख शाह, प्रदीप सियाल, प्रकाश सुराणा, दीपक मिश्रीकोटकर, अनुप डोणगावकर, प्रकाश नेवे, सुरेश अग्रवाल, विजय सावजी, निलेश लव्हाडे यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा न्यायालयात महावीर जयंती
जालना : व्यक्ती आणि परिस्थिती बदलता येत नाही. मात्र आपण स्वत: निश्चितच बदलू शकतो आणि हा बदल घडवण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. व्यवहार आणि अध्यात्म या दोन वेगवेगळ्या बाबी असल्या तरी त्यांची सांगड घालता आली पाहिजे, असे प्रतिपादन प्रथम सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी येथे बोलतांना केले.
जैन समाजाचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना जिल्हा वकील संघाच्यावतीने प्रथमच जिल्हा न्यायालयात भगवान महावीरांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना न्या. टेकाळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश वेदपाठक, मिश्रा, पोतदार, कोन्होळे, जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. विपुल देशपांडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण उढाण, अ‍ॅड. दिनेश भोजने, अ‍ॅड. भुषण तवरावाला, अ‍ॅड. अनुज लकडे, अ‍ॅड. सोपान शेजूळ, जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष सुदेश सकेलचा, इंद्रकुमार गादीया आदींची उपस्थिती होती.
...तरच महावीर जयंती साजरी केल्याचं सार्थक-अरुणप्रभाजी म.सा.
जालना : भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून जालनेकरांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला असला तरी, नुसत्या घोषणा देऊन काहीही होत नसते. भगवान महावीरांनी सांगितलेले तत्त्व जोपर्यंत तुम्ही अंगिकारत नाही, तुमच्या मनात उतरवत नाहीत, तोपर्यंत महावीरांची जयंती साजरी करण्याला कोणताही अर्थ प्राप्त होत नाही. भगवान महावीरांचे तत्व अंगिकारले तरच महावीर जयंती साजरी केल्याचं सार्थक होईल, असा हितोपदेश प. पू. अरुणप्रभाजी म. सा. यांनी येथे बोलताना दिला.
जैन समाजाचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी येथील तपोधाममधील गुरुगणेश भगवानमध्ये आयोजित विशेष प्रवचनात प. पू. अरुणप्रभाजी म. सा. बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर प. पू. दिलीपकुंवरजी म. सा; प. पू. सौम्यप्रभाजी म. सा. प. पू. गुलाबकवंरजी म. सा. आदींची उपस्थिती होती. प्रारंभी गुलाबकंवरजी म. सा. यांनी भगवान महावीरांच्या चरित्राबद्दल थोडक्यात माहिती दिली. पुढे बोलताना प. पू. अरुणप्रभाजी म्हणाल्या की, खरे तर आम्ही खरोखरच भाग्यशाली आहोत की आम्हाला अहिंसेचा आणि जियो और जिने दो असा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती साजरी करण्याची संधी मिळाली आहे. परंतु भगवान महावीरांबद्दल आपल्याला किती आस्था आहे?


Web Title: The city of Jalna, the city of Jalna, is surrounded by 'Jay Mahavir'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.