सिडकोला जालन्यात हवी चारशे एकर जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST2021-01-04T04:26:09+5:302021-01-04T04:26:09+5:30
शहराचा वाढता विकास लक्षात घेऊन तसेच नोकरदारांना त्यांच्या घराचे स्वन्न हे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध व्हावे म्हणून हा प्रकल्प महत्त्वाचा ...

सिडकोला जालन्यात हवी चारशे एकर जागा
शहराचा वाढता विकास लक्षात घेऊन तसेच नोकरदारांना त्यांच्या घराचे स्वन्न हे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध व्हावे म्हणून हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येते. हा प्रकल्प नव्याने उभारण्यासाठी आता पालकमंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेतला आहे. सिडको प्रशासन, जिल्हाधिकारी, तसेच नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची पंधरा दिवसांपूर्वी बैठक झाली. त्या बैठकीत सिडकोतील अधिकारी आता नव्याने जालन्यात येऊन जागेच शोध घेणार आहेत. यासाठी चारशे एकर जागा हवी असल्याचे सांगण्यात आले. शहराजवळ एवढी मोठी जागा सध्या तरी शिल्लक नसून, खाजगी शेतकऱ्यांची जमीन घेऊन हा प्रकल्प उभारावा लागणार आहे.
केवळ ले-आऊट तयार करून देणार
जालन्यात सिडको केवळ ले-आऊट तयार करून रिकामे प्लॉट इच्छुकांना देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले; परंतु अशा प्रकारचे सिडकोतील ले-आऊट कधी होणार आणि कधी आपले घर होणार या चिंतेत नागरिक, कामगार आहेत. येथील बिल्डर लॉबीसाठीदेखील हा प्रकल्प जेवढा लांबणीवर पडेल तेवढे चांगले असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात लवकरच सिडकोच्या अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ जालन्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.