वीज पुरवठा खंडित प्रकरणी मुख्यमंत्री मध्यस्ती करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST2021-02-12T04:29:09+5:302021-02-12T04:29:09+5:30
गेल्या महिन्याभरापासून वीज वितरण कंपनीने थकबाकीचे कारण पुढे करत थेट वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली ...

वीज पुरवठा खंडित प्रकरणी मुख्यमंत्री मध्यस्ती करणार
गेल्या महिन्याभरापासून वीज वितरण कंपनीने थकबाकीचे कारण पुढे करत थेट वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, एरवी विहिरीत पाणी नसल्याने टँकरने पाणी आणून पिकांना जीवनदान दिले जात होते. परंतु यंदा परिस्थिती बदलली आहे.
परतीच्या पावसाने यंदा विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा असून, गहू, ज्वारी तसेच मोसंबी, डाळिंब बागांना पाणी देणे अत्यावश्यक आहे. परंतु वीजच नसल्याने डोळ्यांदेखत पिके जळत आहेत. या संदर्भात गुरूवारी अनेक शेतकऱ्यांनी माजी मंत्री खोतकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. या व्यथा ऐकल्यावर खोतकरांनी कृषिमंत्री दादा भुसे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनाही ही माहिती देऊन वीज पुरवठा खंडित न करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली. यासह खोतकरांनी थेट या वीज पुरवठा खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही कानावर ही बाब घातली. त्यांनी मध्यस्ती करण्याचे आश्वासन दिले.