शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्तेंना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी; मनोज जरांगे बरसले

By विजय मुंडे  | Updated: October 14, 2023 13:09 IST

राज्याच्या कानाकोपऱ्यातून अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांचा जनसागर उसळला होता.

- विजय मुंडे/पवन पवारअंतरवाली सराटी: अंतरवाली सराटीतील सभेसाठी सात कोटी रूपये लागल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. शिवाय सभेत हिंसाचार होईल म्हणून मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. या वक्तव्यांचा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी समाचार घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सहकार्यांना समज द्यावी, असेही जरांगे म्हणाले.

अंतरवाली सराटी येथे शनिवारी दुपारी आयोजित सभेत जरांगे बोलत होते. आजच्या जनसागराने मराठ्यांची ताकद शासनाला दाखवून दिली आहे. आपल्या मुलांचे भविष्य सुखाचे घडवायचे असेल तर आज आपल्या संघर्ष करावा लागणार आहे. आता मागे हटायचे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाने मराठा समाजाला हक्काचे आरक्षण देण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा.मराठा समाजाने पुढील दहा दिवस गाफिल राहू नये. आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. उचकू नका उद्रेक व जाळपोळ करून नका. शांततेत आंदोलन करा. आरक्षण मिळाल्याशिवाय मी माझ्या घरचा उंबरा शिवणार नाही. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, असा पुर्नरूच्चारही जरांगे यांनी केला.

२२ ऑक्टोबरनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविणारमहाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्त समितीला पाच हजारावर कागदपत्रांचा पुरावा सापडला आहे. त्यामुळे आता समितीचे काम बंद करून तात्काळ मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर करीत आरक्षण द्यावे. आता आमची वाट पाहण्याची क्षमता नाही. पुढील दहा दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

सभास्थळापासून १० किमी अंतरावर वाहनेराज्याच्या कानाकोपऱ्यातून अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांचा जनसागर उसळला होता. सभास्थळावरून दहा किलोमीटर अंतरावर वाहने लावून लाखो समाज बांधव सभास्थळी दाखल झाले होते. छत्रपतीसंभाजीनगर, जालना, बीडसह इतर मार्गावर, शेतशिवारात वाहनांच्या रांगाच रांगा होत्या.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाChhagan Bhujbalछगन भुजबळGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद