शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

"छगन भुजबळ बेइमान माणूस, त्यांना गोड बोलून राज्यात दंगली घडवायच्यात": मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 17:04 IST

अतिबेइमान माणूस आहे, त्यांच्यासारखा माणूस जन्मू नाही कोणत्याच समाजात: मनोज जरांगे

- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : ''छगन भुजबळ यांना राज्यात गोड बोलून दंगली घडवायच्या दिसतात. ते कोणाचेच नाहीत. फक्त स्वतःच घर कसं भरलं, हेच पाहतात. अतिबेइमान माणूस आहे, त्यांच्यासारखा माणूस जन्मू नाही कोणत्याच समाजात. इतके वाद लावून देणारा, इतके काड्या लावून देणारा, इतकं वातावरण दूषित केलं त्यांनी. आता जाऊन सांगतात की, शांतता राहिली पाहिजे. इथून मागे नीट वागायचं ना कशाला शेण खाल्ल'', अशी सडकून टीका मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली यावर केली.

पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन जरांगे पाटील हे सोमवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. या दरम्यान त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, ''छगन भुजबळ गेले काय आणि राहिला काय, कुठे बसलाय काय याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. लय बेईमान आहे, जिथे खातात तिथेच घाण करतात. त्यांना वाटतं असंच पेटत ठेवायचं आणि विधानसभेला फायदा उचलायचा. हातात त्यांच्या आहे की तुमच्या आहे, त्यांना द्या ना लाथ मारून काढून.'' असे आवाहन जरांगे यांनी केले.

मराठा आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय बैठकीला बहिष्कार घातला, यावरून जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली. ''तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे. तर तुम्ही द्या ना, तुम्हाला द्यायचं नाही. याच्या त्याच्याकडे बोट दाखवता. त्या छगन भुजबळच्या आहारी चालले. हा छगन भुजबळ यांचा नवीन डाव आहे. तोही सरकारनेच आखायला लावला असेल अस मला वाटतं. मिडियात सांगायचं की, शांतता राहिली पाहिजे म्हणून. मी याच्यात्याच्या दारोदारी भीक मागत हिंडतोय असं याला दाखवायचं आहे, असा डाव दिसतोय. पण शांतता शब्द वापरायचा आणि राज्यात दंगल लावून द्यायची'', अशी टीका जरांगे यांनी केली. 

सरकार म्हटल तर बलिदान देण्यास तयार''माझ्या समाजासाठी जीवाची बाजी लावू शकतो. सरकारने माझे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून जरी मागितले तरी मराठा आरक्षणासाठी द्यायला तयार आहे. सरकार जर म्हणल तुझं मुंडकं उद्या सकाळी तोडून दे, आम्ही आरक्षण देतो. तर मी उद्या सकाळी शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या दारात मुंडकं तोडून द्यायला तयार आहे. समाज आपला मायबाप आहे. तर मरायला काय घाबरायचे. आपल्या समाजासाठी आपला जीव जाईल त्याच्या पलीकडे काय होईल. माझ्या समाजासाठी माझं बलिदान गेलं तर समाजाच तरी कल्याण होईल'', असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील