जप्त वाहनांची आरटीओकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:00 IST2017-12-05T00:00:42+5:302017-12-05T00:00:50+5:30

अवैध वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या वाहनांची सोमवारी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकांनी पाहणी केली.

Checking of vehicles seized by RTO | जप्त वाहनांची आरटीओकडून तपासणी

जप्त वाहनांची आरटीओकडून तपासणी

ठळक मुद्देवाळू तस्करी : चौकशीनंतर आकारणार दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अवैध वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या वाहनांची सोमवारी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकांनी पाहणी केली.
शहागडसह परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाºया काही वाहनांवर महसूलच्या पथकाने काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. मात्र यामध्ये काही टॅक्टर, टिप्पर विना नंबरचे आढळून आले. याबाबत तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांना पत्र पाठवले होते. सोमवारी सायंकाळी मोटार वाहन निरीक्षक बाळासाहेब शेटे यांनी शहागड पोलीस चौकीत असलेल्या अवैध वाळूची टॅक्टर, टेम्पो, टिप्पर, तसेच गोंदी पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या वाहनांची तपासणी केली.
ही वाहने उपप्रादेशिक कार्यालयाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. आम्ही जप्त केलेल्या वाहनांच्या कागदपत्राची तपासणी करून संबंधितांवर दंड आकारणार असल्याचे मोटार वाहन निरीक्षक बाळासाहेब शेटे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

Web Title: Checking of vehicles seized by RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.