जवानावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST2021-01-13T05:20:51+5:302021-01-13T05:20:51+5:30

ज्वारीसह गव्हावर रोगराईचा प्रादुर्भाव बदनापूर : तालुक्यातील भाकरवाडी परिसरात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने बऱ्यांपैकी हजेरी लावल्याने रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात ...

Charge of molestation against a soldier | जवानावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

जवानावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

ज्वारीसह गव्हावर रोगराईचा प्रादुर्भाव

बदनापूर : तालुक्यातील भाकरवाडी परिसरात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने बऱ्यांपैकी हजेरी लावल्याने रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली, परंतु या आठवड्यात ढगाळ वातावरणात सकाळी धुके पडत असल्याने, ज्वारीवर चिकटा तर गव्हावर मावा पडला आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे आता उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत आहेत.

रोषणगाव येथे महिलेचा विनयभंग

बदनापूर : तालुक्यातील रोषणगाव येथे रविवारी रात्री आई व मुलगी घरात झोपलेली होती. तेव्हा संशयित दिनकर भास्कर देशमुख याने कडी वाजवून दार उघडायला लावत महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी सोमवारी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास निवृत्ती शेळके हे करीत आहेत.

मानेगाव जहागीर येथून देशी दारू जप्त

जालना : तालुक्यातील मानेगाव जहागीर येथील रवी गंगाधर ढवळे याच्या किराणा दुकानातून अवैध देशी दारूच्या बारा बाटल्या सोमवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सय्यद मजीद सय्यद फतरू यांच्या फिर्यादीवरून रवी ढवळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास चव्हाण करीत आहेत.

Web Title: Charge of molestation against a soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.