रोजगार हमी योजनेच्या कामाची केंद्रीय पथकाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST2021-02-26T04:44:00+5:302021-02-26T04:44:00+5:30
दि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज, हैद्राबाद यांच्यामार्फत रोहयोच्या कामांचा अभ्यास सुरू आहे. याकरिता देशातील ...

रोजगार हमी योजनेच्या कामाची केंद्रीय पथकाकडून पाहणी
दि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज, हैद्राबाद यांच्यामार्फत रोहयोच्या कामांचा अभ्यास सुरू आहे. याकरिता देशातील २४ राज्यांची निवड करण्यात आली असून, यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यानुसार धामणगाव येथील कामांची गुरुवारी पथकामार्फत पाहणी करण्यात आली. पथकाने रेशीम प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, जनावरांचे गोठे, फळबाग लागवड आदी विविध कामांची पाहणी केली. तसेच यामधील लाभार्थ्यांकडून कामाची मंजुरी, मंजूर रक्कम, काम पूर्ण केले का, मिळालेले अनुदान, या केलेल्या कामांमुळे उत्पन्नात वाढ झाली का, रेशीमचे उत्पादन व त्याची विक्री अशा विविध बाबींची माहिती घेतली. यावेळी विस्तार अधिकारी झिने, सरपंच मोनिका साळवे, उपसरपंच काकासाहेब खैरे, अनिल साळवे, त्रिंबक आढे, संगिता खैरे, ग्रामसेवक मुरमे, हरिभाऊ पवार, पालवे, चंद्रकांत पवार, सोमीनाथ नरोडे, बद्री कुमकर, वच्छलाबाई साळवे आदी उपस्थित होते.
===Photopath===
250221\25jan_17_25022021_15.jpg
===Caption===
धामणगाव येथे रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी करताना केंद्रिय पथक.