शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता बारा बलुतेदारांचा क्रमांक, केंद्र सरकार सर्वांचे आरक्षण घालविण्याच्या तयारीत : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 17:15 IST

Ashok Chavan : केंद्र सरकारने घटना बदलून आरक्षणाची व्याप्ती वाढवावी आणि वंचितांना आरक्षण द्यावे

मंठा ( जालना ) : जसा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन झाला, तसा एक वेळ भाजपचा ( BJP) मुक्ती संग्राम दिन करा. केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार सर्वच बारा बलुतेदारांचे आरक्षण ( Reservation ) घालविण्याच्या तयारीत आहे. त्यात मराठा समाजाचे आरक्षण ( Maratha Reservation ) , ओबीसींचे राजकीय आरक्षण ( OBC Reservation ) गेले, येणाऱ्या काळात इतर सर्व आरक्षण घटणार आहे, असा इशारा राज्याचे बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी दिला. ते मंठा येथे नगरपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आयोजित प्रचार सभेत बोलत होते. केंद्र सरकारने घटना बदलून आरक्षणाची व्याप्ती वाढवावी आणि मराठा समाजाला, मुस्लिम समाजाला, त्यासोबतच जे आरक्षणापासून वंचित राहिले असतील, त्यांना आरक्षण द्यावे, असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले. 

आमदार राजेश राठोड यांनी प्रास्ताविक करून शहराच्या विकास आराखड्याची माहिती दिली. याचवेळी काँग्रेसच्या उमेदवारांवर काहीजण दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आपण ते खपवून घेणार नसल्याचेही आ. राठोड यांनी सांगितले. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आ. सुरेश कुमार जेथलिया, पक्ष निरीक्षक रामकिसन ओझा, सरचिटणीस श्याम उमाळकर, राजेंद्र राख, जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, उपाध्यक्ष किसनराव मोरे, अन्वर देशमुख, सत्संग मुंडे, कल्याण दळे, अनिल मुंडे, सुरेश नागरे, नितीन जेथलिया, तालुका अध्यक्ष नीळकंठ वायाळ यांच्यासह इतर नेते, कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कैलास गोरंट्याल, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, पक्ष निरीक्षक रामकिसन ओझा, कल्याण दळे यांची समयोचित भाषणे झाली. सर्वांनी उपस्थितांना पक्षाची विचारधारा सांगितली.

मुंबई-नांदेड बुलेट ट्रेनसाठी प्रयत्नशील यावेळी बोलताना बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले की,  आपण मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबध्द असून जालना ते नांदेड आणि मुंबई प्रवासासाठी समृद्धी महामार्गाच्या लगत मुंबई - नांदेड या मार्गासाठी आपण बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच मंठा शहराच्या विकासासाठी आमदार राजेश राठोड यांनी मांडलेला विकास आराखडा एकदम स्तुत्य असून तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करायला मी तयार आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणreservationआरक्षणBJPभाजपाcongressकाँग्रेस