मध्यवर्ती बँकेस ३७० पदांची मान्यता : भरती केवळ ९२ जणांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST2021-03-10T04:30:59+5:302021-03-10T04:30:59+5:30
असे असतानाच बँकेच्या जवळपास ६४ शाखा असून, विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून या बँकेचे कामकाज हे ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचले ...

मध्यवर्ती बँकेस ३७० पदांची मान्यता : भरती केवळ ९२ जणांची
असे असतानाच बँकेच्या जवळपास ६४ शाखा असून, विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून या बँकेचे कामकाज हे ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या बँकेवर अतूट विश्वास आहे. आजही या बँकेत जवळपास ३५० कोटी रुपयांच्या ठेवी असून, पीककर्ज वाटपात अन्य बँकांच्या तुलनेने या बँकेने कमी कर्मचारी असतांना मोठी कामगिरी केली आहे. परंतु हे सर्व करत असतांना नवीन पदे भरण्यास मान्यता मिळत नव्हती. ती मान्यता मिळविण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे, बँकेचे उपाध्यक्ष तथा आ. कैलास गोरंट्याल, बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड तसेच बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांनी बराच पाठपुरावा करून सहकार आयुक्त तसेच सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा करून बँकेतील रिक्त जागा भरण्यासाठी जवळपास ३७० जागांना मान्यता आणली. परंतु काही निकष आजही कायम असल्याने बँकेला केवळ ९२ कर्मचाऱ्यांचीच भरती करता येणार आहे.
चौकट
बऱ्याच वर्षांनंतर ही पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे संगणकाचे ज्ञान तसेच उच्च शिक्षण असणाऱ्यांना यात प्राधान्य देऊन तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी भरण्यासाठीचे आमचे प्रयत्न राहतील. पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासह सर्व पक्षीय संचालक मंडळाने बँकेच्या प्रगतीसाठी जी साथ दिली, ती अशीच पुढेही कायम राहिल्यास बँकेचे गतवैभव पुन्हा प्राप्त होईल.
मनोज मरकड, अध्यक्ष जि. म. बँक, जालना